Home > News > अखेर महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालयांची घोषणा...

अखेर महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालयांची घोषणा...

अखेर महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालयांची घोषणा...
X

आदिवासी भागात महिला आणि बालकांच्या मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालयांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे हे रुग्णालय आदिवासी भागात उभं करण्याची मागणी आमदार राजेश राठोड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली होती. यामध्ये आमदार राठोड म्हणाले होते की, किनवट (जि.नांदेड) या आदिवासी तालुक्यात स्वतंत्र स्त्री रुग्णालय स्थापन करण्याचा आयुक्त स्तरावर प्राप्त झालेला प्रस्ताव तसेच गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांच्या रुग्णालयात श्रेणीवर्धनाचा सुधारित प्रस्ताव असे दोन्ही प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत. मात्र यासाठी विलंब का होत आहे. त्यावर माहिती विचारली. त्यावरून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा विषय आर्थिकदृष्या निकषात बसत नसल्याचे म्हंटले. त्यानंतर भाई जगताप आणि प्रवीण दरेकर यांनी या आर्थिक मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर अखेर आरोग्य मंत्र्यांनी किनवट येथे स्त्री रुग्णालय सुरू करण्याची घोषणा केली.

Updated : 20 July 2023 4:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top