खासदार जलीलांच महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन?
X
औरंगाबाद: सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर शहरातील क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात दुकानदारांनी ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान उघडी ठेवल्याने त्यांच्यावर कारवाई करून दुकाने सील करण्यात आली होती. त्यामुळे दुकानाचे सील काढून, दुकाने पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी जलील यांनी कामगार उपायुक्त यांच्या दालनात जाऊन त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला.
याचवेळी जलील यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी यांच्या हाताला धक्का देऊन मोबाईल खाली पाडले. तसेच त्यांना बोट दाखवून रागाने, 'मॅडम येथे एन्टरटेन्मेंटसाठी आलो नाही. जमत नसेल तर बाहेर उभे राहा, असे म्हणून सरकारी कामात अडथळा आणला असल्याचा आरोप महिला पोलीस कर्मचारी कडून करण्यात आला आहे.
दुकानादारांवरही गुन्हा दाखल
जलील यांच्यासोबत आलेल्या 24 दुकानादारांवरही यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदी उल्लंघन करणे आणि इतर कलमानुसार त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.