प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल...
X
सोलापूर: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राजकीय आंदोलन,सभा,मोर्चे काढण्यास बंदी आहे. मात्र तरीही कॉंग्रेसने सोलापुरात कोरोनाचे नियम पायदळी तुडवत काढलेल्या आंदोलनामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
देशातील वाढती महागाई,पेट्रोल-डीझेल आणि घरघुती गॅस सिलेंडरच्या दरात होणाऱ्या वाढीच्या विरोधात शुक्रवारी (ता.16 ) रोजी कॉंग्रेसच्या वतीने सोलापुरात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंग न ठेवता कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तसेच पोलिसांनी दिलेल्या सुचनेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने, पोलिसांनी प्रणिती शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
वाढत्या महागाईच्या मुद्यावरून शुक्रवारी कॉंग्रेसने मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पोषाख घालून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती.