स्मशानात लावलं प्रेमीयुगुलाचं लग्न, मैत्री दिनीच प्रेमी युगुलाची आत्महत्या
X
जिवंतपणी प्रेमविवाहाला विरोध झाला म्हणून प्रेमी युगुलाने आत्महत्या केली आणि मृत्यूनंतर स्मशानात विधीवत लग्न लावण्याची घटना जळगाव जिल्ह्यातील वाडे येथ घडली आहे.
जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील वाडे येथील मुकेश सोनवणे आणि नेहा ठाकरे असं येथील प्रेमी युगुलांचं नाव आहे. जिवंतपणी लग्नाला नकार देणाऱ्या कुटुंबीयांनी मृत्यूनंतर मात्र, या प्रेमी युगुलाची विवाहाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना अग्निडाग देण्याआधी स्मशानभूमीत विधीवत लग्न लावून दिले.
मयत नेहा ठाकरे (वय 19) आणि तिचे कुटुंब गेल्या काही महिन्यांपूर्वी वाडे गावात राहायला आले होते. गावातीलच राहणारा मुकेश सोनवणे(वय 22) यांच्यात प्रेम संबंध जुळले. याबाबतची दोघा कुटुंबियांना माहिती मिळाली. मुलांकडून मुलीच्या कुटुंबीयांकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र, मुलगा मुकेश हा नात्याने नेहाचा चुलत मामा लागत असल्याने लग्नास नकार दिला.
नेहा चे दुसरीकडे आणि मुकेशचे दुसरीकडे लग्न लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आपलं लग्न होणार नाही. हे स्पष्ट झाल्याने 1 ऑगस्ट म्हणजेच मैत्री दिवसाची निवड करत गावातीलच माध्यमिक विदयालयातील इमारतीतील लोखंडी सळईला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
मुकेश याने आत्महत्येपूर्वी व्हॅट्सअप वर 'बाय' असा मेसेज ठेवला होता, त्यानंतर पहाटे आत्महत्या केल्याचं समोर आलं. घटनास्थळावरून चिठ्ठी तसेच इतर काही आढळून आलं नसल्याचं पोलिसांच म्हणणं आहे..