लैगिक अत्याचाराच्या आरोपींना निवडणूकातून हद्द पार करा ; विनेश फोगट ,साक्षी मलिक
X
विनेश फोगट आणि साक्षी मलिक या दोन नामवंत कुस्तीपटूंनी पंतप्रधानांना पत्र लिहून भारतीय क्रीडा क्षेत्रातून खासदार "ब्रिजभूषणसारख्या" लोकांना दूर ठेवण्याची मागणी केली आहे. भारतीय कुस्ती महासंघावरील (डब्ल्यूएफआय) हंगामी समिती बरखास्त करण्याच्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या निर्णयाचा निषेध करत दोन्ही खेळाडूंनी ब्रिजभूषण शरण सारख्या व्यक्तींचा भारतीय कुस्तीवर प्रभाव असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विनेशने सोशल मीडियावर लिहिले, "महिलांच्या ताकदीचा वापर करून मुद्दा कसा फिरवायचा हे पंतप्रधानांना चांगले माहीत आहे. महिला शक्तीचे खरे सत्य जाणून घेण्याची विनंती आम्ही त्यांना करतो." विनेश ५० किलो वजनी गटातून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली असली, तरीही एकाच दिवशी दोन वजन गटातून चाचणी दिल्यामुळे तिच्या सहभागाविषयी अजूनही अनिश्चितता आहे.
साक्षी मलिकने तर देशातील श्रीमंत लोकांच्या शक्तीबद्दल तीव्र टिप्पणी केली आहे. "देशात श्रीमंत इतके शक्तिशाली आहेत की ते सरकार, राज्यघटना आणि न्यायव्यवस्थेच्या वरचढ वाटतात," असे ती म्हणाली. साक्षीने अशीही चिंता व्यक्त केली की, भारतीय कुस्ती महासंघाची हंगामी समिती बरखास्त केल्यामुळे भारतातील महिला कुस्तीपटूंचा अपमान करण्याची परंपरा कायम राहण्याची शक्यता आहे.
दोन्ही खेळाडूंनी पंतप्रधान मोदी यांना विनंती केली आहे की ते लैंगिक छळाच्या आरोपांना सामोरे जात असलेल्या ब्रिजभूषण शरण सारख्या व्यक्तींना भारतीय क्रीडा क्षेत्रापासून दूर ठेवून,लैगिक अत्याचाराच्या आरोपींना निवडणूकातून हद्द पार करा अशी मागणी केली आहे.