माझ्याही जीवाला धोका असतानाही पोलिसांकडून... तेजस्वी घोसाळकर
X
मुंबईत गोळीबाराच्या क्राइमला उत आला असून बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रयातील गॅलेक्सी अपार्टमेंट समोर सलमान खानच्या घराच्या दिशेने हल्लेखोरांनी 6 गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी सलमानच्या घराजवळ असलेल्या गॅलरीला लागली असून या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स विश्नोईच्या भावाने घेतली असून मुंबई पोलिस तातडीने जागे झाले असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नेते अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी चांगल्याचं संतापल्या आहेत.
दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर या असून घोसाळकर हे ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक होते. काही महिन्यांपूर्वी अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर त्यांना गंभीर जखमी अवस्थेत दहिसरच्या करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान घोसाळकरांचा मृत्यू झाला.. तर त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नोरोन्हा यानंही स्वतःवर गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली.. धक्कादायक बाब म्हणजे मॉरिस भाई आणि अभिषेक घोसाळकर हे फेसबुक लाईव्ह करत होते. फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर मॉरिसनं अभिषेक घोसाळकरांवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या
आशात बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर रविवारी पहाटेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. वांद्रयातील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या समोर दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी सलमान खानच्या घराच्या दिशेने 6 गोळ्या झाडल्या होत्या. यातील एक गोळी सलमानच्या घराजवळ असलेल्या गॅलरीला लागली असून या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स विश्नोईच्या भावाने घेतली आहे. दरम्यान या घटनेनंतर विविध नेते आणि सेलिब्रिटिंनी सलमान खानची भेट घेतली. तर दुसरीकडे गोळीबारानंतर सलमानच्या घरी यंत्रणांची सूत्र चालवताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी उद्विग्न पोस्ट शेअर केली.
तेजस्वी घोसाळकर यांनी ही पोस्ट इन्स्टाग्रामवर केली असून, यामध्ये "सलमान खानच्या घराबाहेर हवेत गोळीबार झाला तर मुंबई पोलिसांची सगळी यंत्रणा कामाला लागली. परंतु अभिषेकच्या मर्डर केसचा उलगडा करण्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. माझ्याही जीवाला धोका असतानाही पोलिसांकडून मला कुठलेही संरक्षण दिले गेले नाही. मला सलमान खान सारखे संरक्षण का दिले गेले नाही? त्यांनी असा सवाल उभा केला आहे. जर सिस्टीम एखाद्या सेलिब्रिटीची सुरक्षा मजबूत करण्यासाठी रॅली करू शकते, तर मला संभाव्य हानीसाठी असुरक्षित का ठेवले जाते? अशी टिका सुद्धा तेजस्वी घोसाळकर यांनी केली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा आजतागायत योग्य तपास झालेला नाही. राज्य सरकार कोणत्याही प्रकारची मदत करत नसल्याचा आरोप घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी यांनी केला आहे. मात्र बॉलीवूड कलाकारच्या घरावर हवेत गोळीबार झाल्यानंतर एवढी सुरक्षा दिली जाते. मग अभिषेक घोसाळकर यांची पत्नी मी विधवा असताना मला सुरक्षा का दिली जात नाही? असा सवाल यावेळी तेजस्वी घोसाळकर यांनी उपस्थित केला.