''भाजप आणि शिवसेनेची छुपी युती'' एकनाथ खडसेंचा आरोप
जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेची छुपी युती दिसून येत असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला आहे.
X
मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा ही दोन नावं चर्चेत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला. आणि त्यानंतर राज्याचे राजकारण चांगलंच तापले आहे. याच तापलेल्या राजकारणात नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले. त्यानंतर त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं.
या सगळ्या प्रकारानंतर त्यांना चौदा दिवसांची कोठडी झाली आणि त्यांना नुकताच कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आता जामीन मंजूर झाल्यानंतर देखील त्यांची चर्चा काही कमी झालेली नाही. करण जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं होतं आणि त्याच रुग्णालयात या कक्षात त्यांनी काढलेले फोटो सध्या समाज माध्यमांवर बाहेर झाले आणि त्यानंतर यावरून MRI कक्षात फोटो कसे काय म्हणून त्यांच्यावर टीका केली जात आहे. या सगळ्यावर आता माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला आहे. नवनीत राणा या राष्ट्रवादीच्या व शरद पवारांच्या टेकुमुळे निवडून आलेले आहेत. त्यांनी स्वतःची ताकद आधी निर्माण करावी आणि मग मुख्यमंत्र्यांशी निवडणूक लढवावी असं म्हणत टीका केली आहे.
येणाऱ्या निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढले का?
येणाऱ्या निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे का याविषयी देखील खडसे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे की स्वतंत्र लढवाव्यात हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचे सांगतानाच जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेची छुपी युती दिसून येत असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला आहे. रावेर तालुक्यातील कोचुर येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.