Home > News > 'पेपर फुटलाच नाही, विद्यार्थ्यांनी काळजी करू नये', वर्षा गायकवाड याचं स्पष्टीकरण..

'पेपर फुटलाच नाही, विद्यार्थ्यांनी काळजी करू नये', वर्षा गायकवाड याचं स्पष्टीकरण..

दोन दिवसांपूर्वी मुंबईत १२ वीचा पेपर फुटल्याची बातमी अफवा असून पेपर फुटलाच नसल्याचं स्पष्टीकरण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं आहे.

पेपर फुटलाच नाही, विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, वर्षा गायकवाड याचं स्पष्टीकरण..
X

काही दिवसांपूर्वी मुंबईत बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली होती. काही विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये प्रश्नपत्रिका आढळली होती शिवाय ते परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले होते. यानंतर विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केल्याची देखील माहिती होती. परंतू रसायनशात्राचा पेपर फुटलाच नाही, या बातम्या फक्त अफवा असल्याचं स्पष्टीकरण शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं आहे.

"शनिवारी दिनांक १२ मार्च रोजी झालेल्या इयत्ता बारावीच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. पेपर फुटला, असा चुकीचा प्रचार काही समाजमाध्यामातून सुरू आहे, त्यात कोणतंही तथ्य नाही," अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिली.

"विले पार्लेमधील एका केंद्रावर एका विद्यार्थीनीच्या फोनमध्ये १० वाजून २४ मिनिटांनी प्रश्नपत्रिका आढळली होती. ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना पेपर वाटप झाल्यानंतर आढळली आहे. हा प्रकार गंभीर आहे, याप्रकरणी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांकडून तपास सुरू आहे. बोर्डाच्या चौकशीनुसार, पेपर वाटप केल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फोनमध्ये आढळली होती. मात्र पेपर फुटलेला नाही, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून चौकशीत आणखी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल," असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Updated : 14 March 2022 1:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top