पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का? काय म्हणाल्या पहा..
X
महाराष्ट्रात राज्यभा निवडणुकीवरुन (rajya sabha election 2022) राजकीय वातावरण तापले असताना भाजपनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल ( Piyush Goyal) आणि डॉ. अनिल बोंडे (anil bonde) यांना राज्यसभा उमेदवारी घोषीत केली आहे. भाजप तिसऱ्या जागेसाठी उमेदवार देणार अशी चर्चा होती. या तिसऱ्या जागेसाठी पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत होते. पण भाजपने तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर संधी मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं. आता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळणार अशी चर्चा सुरू आहे. खरतर एकेकाळी राज्यातील मुख्यमंत्रीपदाच्या प्रमुख दावेदार आलेल्या पंकजा मुंडे यांनी राज्यसभेवर संधी न मिळाल्याने पक्षाकडून डावलले जात आल्याची भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे. आता या सगळ्या प्रकरणावरून पंकजा मुंडे यांनी राज्यसभेसाठी माझं नाव चर्चेत नव्हतंच अस म्हंटल आहे.
काल एक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांना तुम्ही मुख्यमंत्री होण्यास इच्छुक आहेत का? असा प्रश्न करण्यात आला. खरतर पंकजा मुंडे यांनी मागे मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यांचे 'मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे' या वाक्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. पण आता मात्र त्यांनी मला मुख्यमंत्री होण्याची अजिबात इच्छा नाही. सध्या जे चालू आहे ते पाहता मी आहे तिथेच बरी आहे असं म्हंटल आहे.