Home > News > स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांना अखेरपर्यंत वेठीस आणलेल्या बेगम हजरत महल कोण होत्या माहीत आहे का?

स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांना अखेरपर्यंत वेठीस आणलेल्या बेगम हजरत महल कोण होत्या माहीत आहे का?

स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांना अखेरपर्यंत वेठीस आणलेल्या बेगम हजरत महल कोण होत्या माहीत आहे का?

स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांना अखेरपर्यंत वेठीस आणलेल्या बेगम हजरत महल कोण होत्या माहीत आहे का?
X

आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील हे एक महत्वाचा नाव आहे. अत्यंत गरीब कुटूंबात जन्मलेल्या बेगम हजरत महल यांचा जन्म 1820 ला अवध प्रांतात फैजाबाद जिल्हयातील एका खेडेगावात झाला. घरात असलेल्या गरिबीमुळे त्या राजेशाही घराण्यांत नृत्य करण्यासाठी जात होत्या. त्या दिसायला इतक्या सुंदर होत्या की या सौदर्याला पाहून नावाबाने त्यांना त्यांच्या शाही हराम मध्येच सहभागी करून घेतले. त्यामुळेच त्यांना पुढे हजरत महल ही उपाधी मिळाली.

काही काळ गेला आणि इस्ट इंडिया कंपनीने या राज्यावर कब्जा करत नवाब वाजीद शहा याला बंदी करून बंदिवासात टाकले. आता गादीचा विषय आला मग बेगम हजरत महाल यांनी राज्याचीच सत्ता सांभाळण्याचा निर्णय घेतला व त्यांनी त्यांच्या लहान मुलाला गादीवर बसवले. त्या स्वतः सगळा राज्यकारभार पाहू लागल्या. त्या राज्यकारभार पाहू लागल्यावर ना कुठला दुजाभाव होता न कुठला धर्मभेद. त्यांनी सैन्यात सर्व धर्मियांना सारखेच अधिकार दिले. झाशीची राणी लक्ष्मीबाई प्रमाणे सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी त्या स्वतः युद्ध स्थळी जाऊ लागल्या.


त्यांनी 1857 च्या बंडात मोठा पराक्रम गाजवलला...तर काय केलं होत त्यांनी?

1857 ला इंग्रजांविरोधात युद्ध सुरू केले. या युद्धाचे नेतृत्व स्वतः त्यांनी केले. मात्र इंग्रजांच्या बलाढ्य शक्ती समोर त्यांना हार पत्करावी लागली. त्यांना त्यांचा महाल पण सोडावा लागला. पण पराभव झाला म्हणून त्या गप्प बसल्या नाहीत. सारखा इंग्रजांना शह देन्यचा त्या प्रयत्न करत होत्या. त्यांनी इंग्रजांना हाकलून लावण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. पण इंग्रजांची भली मोठी फौज, अफाट दारुगोळा यामुळं त्यांना त्यांच्या विरोधात लढता आले नाही पण त्यांनी ज्या प्रकारे इंग्रज सैन्यास वेठीस आणले होले ते खूपच कौतुकास्पद आहे. आता हे लोक आपल्याला पकडणार आणि बंदीत ठेवर अस बंदीत राहणं त्यांना सहन होणार नव्हतंच म्हणून त्या त्यांच्या मुलासोबत नेपाळला गेल्या.

Updated : 15 Aug 2021 7:02 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top