बारामतीतून सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा उमेदवारीची चर्चा
X
पवार कुटुंबाची कर्मभूमी असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या मतदारसंघामध्ये उमेदवार उभा करण्याची जय्यत तयारी चालू असल्याच दिसत आहे. 2024 ला पार पडणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मजबूत उमेदवार देऊन त्यांना पराभूत करण्याची रणणीती अजित पवार गटाकडून आखली जात आहे.
बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याच समजत आहे. केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे. या पार्श्वभूमीवर, बारामती परिसरात त्यांच्या माहिती व कार्याचा आढावा घेणारा प्रचार रथ फिरतांना दिसला आहे.
हा प्रचार रथ बारामती शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये फिरत आहे. रथामध्ये सुनेत्रा पवार यांच्या कार्याची माहिती देणारे फलक, व्हिडिओ आणि पुस्तिका ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, रथातून LED स्क्रीनच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांच्या भाषणाचे ऑडिओही वाजवले जात आहे.
या प्रचार रथाचा उद्देश बारामतीतील मतदारांना सुनेत्रा पवार यांची माहिती देणे आणि त्यांना निवडून देण्यासाठी आवाहन करणे हा आहे.
सुनेत्रा पवार यांच्या माहिती व कार्याचा आढावा घेणारा प्रचार रथ बारामतीतील मतदारांमध्ये चांगला प्रतिसाद मिळवत आहे. या रथामुळे सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला आणखी बळ मिळण्याची शक्यता असून 2024 च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधातला मजबूत उमेदवार म्हणून त्यांची चर्चा आहे.