'चल फुट..' पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या फ्लेक्सची राज्यात चर्चा
X
पुणेरी पाट्या भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत. तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये नाष्टा करायला गेलात आणि त्या ठिकाणी तुम्हाला 'एक मिसळ दोघात खाऊ नये' अशी पाटी दिसली तर त्यात काही आश्चर्य वाटू नये. इतकंच नाही तर तुम्ही पुण्यात नवीन गेला असाल आणि कुठल्या मित्राकडे किंवा पाहुण्याकडे गेले असाल तर त्यांच्या दारात तुम्हाला अगदी बेल वाजवण्यासाठी सुद्धा सूचना लिहिलेले दिसेल, तुम्हाला तिथे एक पाटी दिसेल त्यावर लिहिलेला असेल की, 'बेल वाजवल्यावर काही वेळ थांबा. घरात माणसे राहतात स्पायडरमॅन नाही.' अशा पाट्या तुम्हाला पुण्यात ठिकाणी दिसतील. आता त्याचं काही नवल नाही. कारण पुणे हे ऐतिहासिक, सामाजिक राजकीय संस्कृती परंपरेसोबत पुणेरी पाट्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. मात्र आता पुणेरी पाट्यांबरोबर पुणेरी फ्लेक्सची सुद्धा राज्यात नाही तर देशात चर्चेत आहेत.
पुणेरी लोक राजकीय जाणकार आहेत असं म्हटलं जातं. त्यामुळे सहाजिकच तिथल्या लोकांकडून राजकीय विषयांवरून काही फ्लेक्स लागले आणि ते ही पुणेरी टोमणे असणारे असले तर त्यात काही नवल वाटण्याचे कारण नाही. आता हेच बघा ना पुण्यात सध्या एका फ्लेक्सची सर्वत्र जोरात चर्चा सुरू आहे. तुम्ही म्हणाल राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीची चर्चा असताना पुण्यात कोणत्या फ्लॅटची चर्चा असणार. तर पुण्यात जे सध्या फ्लेक्स झळकत आहे ते या राज्यसभेच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या पुण्यातल्या एका आमदारा संदर्भातील आहे. आता पुण्यातला कोण आमदार? असा तुमच्या मनात प्रश्न आला असेल. मी पुण्यातल्या त्याच आमदारा विषयी बोलत आहे जे कोल्हापूरहून थेट पुण्यातल्या जागेवर निवडणूक लढले आणि तिथं निवडून देखील आले. होय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचा पुण्यात एक फ्लेक्स लावण्यात आला आहे आणि हाच फ्लेक्स सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांचा कोणता फ्लॅट सध्या चर्चेत आहे
चंद्रकांत दादा पाटील यांचा परवा वाढदिवस होता. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात त्यांचा एक बॅनर लावण्यात आला होता. हा बॅनर चंद्रकांत दादा यांना शुभेच्छा देणारा होता. मात्र तो ज्या ठिकाणी लावला त्या ठिकाणावरून चंद्रकांतदादा पाटील यांच्या या फ्लेक्सची जोरदार चर्चा आहे. तो बॅनर लावला आहे त्यावर लिहिला आहे की, प्रतीक सभ्यता आणि सुसंस्कृततेचे माननीय चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, आणि या बॅनरवर चंद्रकांत दादा यांचा मोठा फोटो त्याचबरोबर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा फोटो आहे. आता तुम्हा सगळ्यांना विचार पडला असेल की या बॅनरची चर्चा होण्यासारखं यामध्ये काय आहे? तर हा बॅनर ज्या ठिकाणी लावला आहे त्याच बॅनरच्या अगदी समोर रस्त्याकडेला वाहतुकीचे नियम सांगणारा एक बोर्ड आहे. आणि त्या बोर्ड वरती लिहिले आहे 'No Stoping No standing' आता या बोर्ड वरून अनेकांनी असं म्हटलं आहे की, "No Stopping, No Standing" या शब्दश: अर्थ "चल फुट.." असा तर होत नाहीना... सभ्यता आणि सुसंस्कृततेचे प्रतीक असलेली पुणेकर मंडळी काय अर्थ काढतील त्यांच त्यांनाच ठाऊक..!
तर अशाप्रकारे सध्या चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या या फ्लेक्सची चर्चा सुरू आहे. आता पुणेकरांनी लावलेल्या फ्लेक्सचा हेतू जरी तसा नसला तरी पुणेरी पाट्यांमुळे प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील या फ्लॅटची चर्चा सध्या राज्यात नाही तर देशभरात सुरू आहे.