Home > News > अमृता फडणवीस यांचा नवा लूक, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अमृता फडणवीस यांचा नवा लूक, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

विधान सभेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या नेहमी काही ना कारणाने चर्चेत असतात. नुकतंच अमृता फडणवीस यांनी नवा फोटो सोशल मीडियावरती शेअर केला असून ‘स्त्रीशक्ती’ असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे

अमृता फडणवीस यांचा नवा लूक, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
X

विधान सभेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या नेहमी काही ना कारणाने चर्चेत असतात. नुकतंच अमृता फडणवीस यांनी नवा फोटो सोशल मीडियावरती शेअर केला असून 'स्त्रीशक्ती' असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे.

"महिला जेव्हा आपल्या उणिवांनाच आपली ताकद बनवतात, तेव्हा त्या सर्वात बलशाली असतात," असं कॅप्शनही अमृता फडणवीसांनी दिले आहे. अमृता फडणवीस यांनी या फोटोंमध्ये भगव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तसंच हाय हिल्सही घातल्या आहेत. त्यांचा लुक एकदम ग्लॅमरस दिसतो आहे.

अमृता यांनी एकूण दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी अमृता फडणवीसजी तुम्ही छान दिसत आहात. तुम्ही स्त्रीशक्तीचा चेहरा आहात अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी तुम्ही हाथरस प्रकरणावर गप्प का? असाही प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारला आहे.

Updated : 7 Oct 2020 6:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top