नायब तहसीलदार बहिणीवर सख्या भावानेच केला कोयत्याने हल्ला...!
X
केज येथील नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कौटुंबिक कलहातून सख्या भावानेच केला कोयत्याने हल्ला ही घटना सोमवारी सकाळी घडली. नायब तहसीलदार आशा वाघ तहसिल कार्यालयात असताना ही घडली आहे आरोपीने आशा वाघ यांच्या मानेवर व डोक्यावर वार केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
नेहमीप्रमाणे आशा वाघ या सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कार्यालयात आल्या. त्यानंतर त्यांचा सख्खा भाऊ मधुकर दयाराम वाघ वय 45 दोनडिगर ता. चाळीसगाव जि. जळगाव हा कार्यालयात आला त्याने काही कळण्याच्या आत कोयत्याने बहीण आशा यांच्या मानेवर आणि डोक्याहवर प्राणघातक हल्ला केला. याच अवस्थेत जिवाच्या आकांताने आशा वाघ शेजारी संजय गांधी निराधार कार्यालयात पळाल्या. उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी हल्लेखोर भाऊ मधुकर यास पकडून ठेवलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून आशा वाघ यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी आंबेजोगाई शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्लेखोर मधुकर वाघ आणि नायब तहसीलदार आशा वाघ यांच्या मध्ये गेल्या काही दिवसापासून कौटुंबिक वाद सुरू आहेत. शेतीच्या आणि अन्य वादातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. तहसील कार्यालयात घुसून सख्ख्या बहिणी वर जीवघेणा हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने त्याला ताब्यात घेतले आहे.