Home > News > PMC च्या अंदाजपत्रकात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहाची तरतूद करण्याची मागणी

PMC च्या अंदाजपत्रकात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहाची तरतूद करण्याची मागणी

पुण्यातील नव्याने विकसित होत असलेल्या कोंढवा खु.,कोंढवा बु., हडपसर, येरवडा, नऱ्हे, आंबेगाव, उंड्री, अशा भागात सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय नाही.

PMC च्या अंदाजपत्रकात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहाची तरतूद करण्याची मागणी
X

पुणे महानगरपालिकेच्या २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था करावी. खास करून नव्याने विकसित होत असलेल्या कोंढवा खु.,कोंढवा बु., हडपसर, येरवडा, नऱ्हे, आंबेगाव, उंड्री, अशा भागात सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय नाही, ती लवकरात लवकर केली जावी. तसेच आज शहरात विशेषत: रस्तारुंदीमुळे अनेक ठिकाणची स्वच्छतागृहे पाडण्यात आली आहेत. ती पुन्हा बांधून व त्यांच्या देखभालीची सुयोग्य व्यवस्था करून ही महत्वाची सुविधा उपलब्ध करून द्यावी व त्यासाठी बजेटमध्ये आवश्यक ती तरतूद व्हावी,अशी मागणी 'इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप' च्या वतीने अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

तर, विकासकामांच्या संदर्भात नागरिकांच्या सूचनांना स्थान देण्याची मागणी स्वयंसेवी संस्थांच्या वतीने पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर केल्यावर स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांच्या 'स' यादीतील अनावश्यक कामांसाठी पुणेकर करदात्यांचा पैसा उधळू नये. सार्वजनिक स्वच्छतागृहे,कचरा नियोजन व व्यवस्थापन,छोट्या बाजारपेठा,वाहनतळ,मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी आवश्यक तरतूद करावी,अशीही मागणी करण्यात आली.

'गरीब-श्रमिक वर्गामध्ये ज्या सोयीसुविधांचा अभाव आम्हाला जाणवतो त्यांच्या पूर्ततेसाठी धोरणात्मक निर्णय घेतले जावे व त्यासाठी अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद केली जावी,कोरोना साथीनंतर पालिकेची अर्थव्यवस्था अजून सुधारलेली नाही हेही लक्षात घ्यावे', असे या पत्रकात म्हटले आहे.

Updated : 25 Aug 2021 7:50 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top