औरंगाबादच्या दीक्षाची 'नासा'च्या फेलोशिप पॅनलवर निवड
X
जगप्रसिद्ध नासा (NASA ) या अमेरिकन संस्थेत एमएसआय या फेलोशिप व्हर्च्युअल पॅनलवर पॅनलिस्ट म्हणून औरंगाबादच्या दहावीतील विद्यार्थिनी दीक्षा शिंदेची निवड झाली आहे. स्टीफन हॉकिंग यांच्या पुस्तकामुळे संशोधनपर लेखनाची प्रेरणा मिळालेल्या आयसीएसई बाेर्डात शिकणाऱ्या दीक्षाला तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळाले आहे.
दीक्षाने 'ब्लॅक होल्स अँड गॉड' हे देवाच्या अस्तित्वासंबंधीचा लेख नासाला पाठवला होता. ज्यात तिने देव नाही असा निष्कर्ष मांडला. नासाच्या या संकेतस्थळावर दीक्षाने प्रथम जून २०२० मध्ये संशोधनपर लेख पाठवला. तो नाकारण्यात आला. दुसऱ्या प्रयत्नातही यश आले नाही. पण हार न मानता प्रयत्न सुरू ठेवणाऱ्या दीक्षाची सप्टेंबर २०२० मध्ये तिसऱ्या प्रयत्नात निवड झाली.
दीक्षाचे वडील कृष्णा शिंदे केळीगव्हाण (ता. बदनापूर) येथील केंद्रीय निवासी माध्यमिक आश्रमशाळेत मुख्याध्यापक, तर आई रंजना गृहिणी आहेत. मुलीच्या निवडीनंतर त्यांना प्रचंड खुश आहेत.तर पॅनलिस्ट म्हणून सहा महिन्यांसाठी नियुक्ती असून ५० हजार रुपये मानधन मिळणार आहे'', असे दीक्षाने सांगितले