Home > News > मुंबईत आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे ; सफाई कर्मचाऱ्याने इंजेक्शन दिलेल्या बाळाचा मृत्यू..

मुंबईत आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे ; सफाई कर्मचाऱ्याने इंजेक्शन दिलेल्या बाळाचा मृत्यू..

मुंबईत आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे ; सफाई कर्मचाऱ्याने इंजेक्शन दिलेल्या बाळाचा मृत्यू..
X

सफाई कर्मचारी महिलेने चुकीचे इंजेक्शन दिल्याने दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेच्या भोंगळ कारभारावर प्रश्न उभा राहिला आहे.

गोवंडीतील शिवाजीनगर येथे दोन वर्षाच्या मुलाला सफाई कर्मचारी महिलेने चुकीचे इंजेक्शन दिल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर ताह आजम खान असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर त्याला उलट्या, जुलाबाचा त्रास होत असल्याने त्याच्या आई वडिलांनी जवळच्या नूर रुग्णालयात 11 जानेवारीला दाखल केले होते. तसेच दुसऱ्या दिवशी चिमुकल्या ताहला डिस्चार्ज देत असताना सफाई काम करणाऱ्या महिलेने इंजेक्शन दिले. ज्यामुळे दोन वर्षाच्या ताहचा मृत्यू झाला. तसेच ताह आजम खान या चिमुकल्याला एक इंजेक्शन सलाइनमधून दिले तर दुसरे थेट टोचले आणि काही वेळातच ताह याचा मृत्यू झाला, असे ताहच्या वडिलांनी सांगितले. याप्रकरणी गोवंडी भागातील नुर हॉस्पिटलचे डॉ. अल्ताफ अब्दुल हसन खान आणि व्यवस्थापक नसिमुद्दीन सय्यद. परिचारिका सलीम उंनीसा खान आणि अल्पवयीन सफाई कर्मचारी असलेल्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलेरिया झालेल्या 16 वर्षीय मुलाला देण्याचे इंजेक्शन चुकून दोन वर्षाच्या बालकाला दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या प्रकरणी इंजेक्शनचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले. तर सध्या हलगर्जीपणा समोर आल्याने चारही आरोपी फरार आहेत. मात्र हे रुग्णालय अजून ही सुरूच आहे.या प्रकरणी मृत मुलाचा वडिलांनी त्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. तर पोलीस या आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राजन यांनी दिली आहे.

Updated : 21 Jan 2022 7:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top