Home > News > चंद्रकांत पाटील यांना ही भाषा शोभत नाही- मंत्री धनंजय मुंडे

चंद्रकांत पाटील यांना ही भाषा शोभत नाही- मंत्री धनंजय मुंडे

चंद्रकांत पाटील यांना ही भाषा शोभत नाही- मंत्री धनंजय मुंडे
X

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या बाबत भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान यानंतर आता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपुर्वी OBC आरक्षणासाठी केलेल्या उपोषणामध्ये माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रीयेमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. आरक्षण देता येत नसेल तर घरी बसा, जेवण करा, दिल्लीत जा नाही तर मसणात जा पण आम्हाला आरक्षण द्या अशा पद्धतीचं विधान त्यांनी सुप्रिया सुळेंवर टीका करताना केलं होतं.

त्यांच्या या विधानावर राज्यभरातील महिलांनी आक्रोश केला होता. महाविकास आघाडीतील प्रत्येक महिला नेत्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर थेट राज्य महिला आयोगानेच चंद्रकांत पाटील यांना सदर प्रकरणी खुलासा करण्याचे आदेश दिले होते.

`राजकारण सोडा आणि स्वयंपाक करा, असं वक्तव्य करुन रोष ओढून घेणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत दादा पाटील यांनीआता माफी मागितल्यानंतर यापुढे कोणत्याही महिलेबद्दल बोलताना विचार करून बोलावे तसेच आपल्या वक्तव्यामुळे महिलेच्या आत्मसन्मानाला धक्का लागू देऊ नये याची काळजी घ्यावी अशी समज चंद्रकांत पाटील यांना महिला आयोगाकडून देण्यात आली आहे शिवाय, चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाच्या मुखातून अशी बाब जाणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. महिलेचा आदर नेमका कसा असतो. याचं भान देखील त्यांना राहिलेले नाही. मात्र त्यांच्या माफीनाम्यानंतर आता विषय संपला आहे. अशी प्रतिक्रीया सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी केला खुलासा

महिला आयोगाच्या या आदेशानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना एक पत्र लिहुन खुलासा केला आहे. आपल्या पत्रात महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत.

मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दुःख नाही. माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो, असं चंद्रकांत दादांनी स्पष्ट केलं होतं.

Updated : 29 May 2022 8:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top