CWG 2022 : ती एक 'मीरा' होती ही एक "मीरा"
X
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 च्या दुसऱ्या दिवशी भारताला एकूण चार पदके मिळाली.सर्व पदके ही वेटलिफ्टिंग मध्ये जिंकली आहेत. त्यापैकी 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाई चानू हिने सुवर्णपदक जिंकत अजून एक विक्रम भारताच्या नावावर केला आहे.मीराबाई चानूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 49 किलो गटाच्या अंतिम फेरीत २०१ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे .
शनिवारी बरमिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकल्यानंतर मणिपूर मधील वेटलिफ्टर मीराबाई चानू च्या मूळ गावी जल्लोष करण्यात आला. मीराबाई चानूच्या अभिमानास्पद विजयाने तिच्या कुटुंबातील आणि आणि शेजाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
मीराबाई चानूने सलग दुसऱ्यांदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. 2022 च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये तिने सुवर्णपदक जिंकले होते
सुवर्णपदक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिराबाईच्या चानूचे अभिनंदन केले आहे. त्यांनी एक ट्विट केले आहे की "असाधारण मीराबाई चानूने पुन्हा एकदा भारताला गौरवलं! बर्मिंगहॅम गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून नवा राष्ट्रकुल विक्रम प्रस्थापित केल्याचा प्रत्येक भारतीयाला आनंद आहे. त्याचे यश अनेक भारतीयांना, विशेषत: नवीन खेळाडूंना प्रेरणा देते."