Home > News > कोरोना योद्ध्यांना मिळाली 'पैठणी'

कोरोना योद्ध्यांना मिळाली 'पैठणी'

covid warrior facilitated by jijau education and social organization

कोरोना योद्ध्यांना मिळाली पैठणी
X

कोरोना संकटाच्या काळात सगळ्यात पुढे राहून या संकटाशी सामना करणाऱ्या आरोग्य योद्ध्यांचा सन्मान जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने करण्यात आला. जेव्हा संपूर्ण देश दिवाळी साजरी करत होता, तेव्हा हे कोरोना योद्धे हॉस्पिटलमध्ये अनेकांचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत होते. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स, आशा सेविका, परिचारीका, मदतनीस यांना मानाची "पैठणी" भेट देत अनोखी "कृतज्ञतेची भाऊबीज" साजर केली गेली. भाऊबीजेच्या दिवशी ठाणे - पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रात हा अनोखा सोहळा पार पडला.


ठाणे - पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये तब्बल 5 हजारांपेक्षा अधिक डॉक्टर्स, आशा सेविका, परिचारीका, मदतनीस यांना ही मानाची पैठणी भेट देण्यात आली.

कोरोनासारख्या संकटाशी लढणाऱ्या या योद्ध्यांचा सन्मान अशापद्धतीने झाल्याने या महिलादेखील भारावल्या होत्या. आपल्या कामाची दखल कुणीतरी घेत आहे, ही भावनादेखील अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रेऱणादायी ठरते, त्यामुळे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचा आदर्श घेऊन अनेक संस्थांनी आता पुढाकार घेण्याची गरज आहे.


"कोरोनाचे भयावह संकट असतानाही या संकटाच्या काळात डॉक्टर्स, परिचारीका, आशा सेविका, मदतनीस यांनी केलेले महान काम शब्दात व्यक्त होण्यासारखे नाही. त्यामुळे भावाच्या नात्याने भाऊबीजेच्या दिवशी कोरोना योद्धा असणाऱ्या आमच्या हजारो बहिणींना त्यांची आवडती पैठणी साडी भेट देवून आम्ही त्यांचा गौरव केला आहे," अशी प्रतिक्रिया जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी दिली. "आजपर्यंत अशा प्रकारची भाऊबीज करून कुणीच आमच्या कामाचे कौतुक करून आम्हाला प्रेरणा दिली नाही, जिजाऊ संस्थेने आम्हाला भाऊबीजेची जी अनोखी भेट दिली आहे ती आम्ही कधीच विसरणार नाही", अशी भावना यावेळी आशा सेविका, परिचारीका यांनी व्यक्त केली.




<

Updated : 18 Nov 2020 2:46 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top