#Coronaupdate ; कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक..
X
मुंबई- गेल्या आठवड्यात साडेतीन लाखांच्या घरात पोहचलेली कोरोना रुग्णसंख्या तीन लाखांच्या आत आली आहे. त्याचबरोबर सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे.
गेल्या आठवड्यात वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येने चिंता वाढवली होती. मात्र गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या कमी होताना आढळत आहे. त्यातच सध्या कोरोना रुग्णसंख्या तीन लाखांच्या आत आली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण नव्या कोरोना रुग्णांपेक्षा अधिक आढळून आल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.
गेल्या 24 तासात देशात 2 लाख 86 हजार 384 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 3 लाख 6 हजार 357 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र गेल्या 24 तासात देशात 573 मृत्यूची नोंद झाली.
वाढत्या रुग्णसंख्येने देशाचे टेन्शन वाढवले असताना देशात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. मात्र सध्या देशात 22 लाख 2 हजार 472 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर हे प्रमाण 5.46 टक्के इतके आहे. यासह दररोजचा कोरोना रुग्णवाढीचा दर 19.59 टक्क्यांवर पोहचला आहे. यासह लोकांची प्रतिक्रीया वाढवण्यासाठी उपयुक्त असलेल्या कोरोना लसीचे 163 कोटी 84 लाख 39 हजार 207 लसीचे डोस देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील शाळा, कॉलेज 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र स्थानिक परिस्थिती पाहून शाळा, कॉलेज सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेतील, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.