Home > News > विज्ञानातील स्त्रियांचे योगदान: शोध, संघर्ष आणि यशोगाथा

विज्ञानातील स्त्रियांचे योगदान: शोध, संघर्ष आणि यशोगाथा

Contributions , Women , Science, Discoveries, Struggles,  Success, Stories
X

चूल, मूल, सांभाळता, सांभाळता

हे असेच का, ते तसेच का

प्रश्न पडे स्त्रीच्या मनाला

जागे होवून,

शोधून काढले विज्ञानाला,

कारण होत्या महिला शिक्षित

त्यामुळेच आहे सगळा देश सुरक्षित.

विज्ञानाच्या क्षेत्रात महिलांची चमकती वाटचाल आजही कायम आहे. विज्ञानाला महिलांनी दिलेले योगदान, त्यांचा संघर्ष यांच्या मशाली आजही सगळ्या विश्वात प्रकाश बनून चमकत आहे. ज्या काळात महिलांनी शिक्षण घेणे हे जगाला मान्य नव्हते, महिलांनी चूल आणि मुलच सांभाळले पाहिजे ह्या संकल्पनेत जग होते त्या काळात सगळ्यांचा विरोध करून महिलांनी विज्ञान क्षेत्रात बाजी मारली. आज आधुनिक काळात देखील दहावी, बारावीनंतर विज्ञान क्षेत्रात प्रवेश घेण्यात महिलाच आघाडीवर असतात. त्यातूनच डॉक्टर्स, इंजिनिअर्स बनून देशाचे नाव प्रगतिपथावर चमकवतात. महिलांची संशोधक वृत्ती विज्ञान क्षेत्रात ज्ञानाचा, यशाचा, प्रगतीचा झेंडा फडकवतात. नासापासून तर 'नोबेल' पुरस्कारापर्यंत महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. विज्ञान क्षेत्रात महिलांनी स्वतःच्या प्रतिभाशाली व्यक्तिमत्वाने इतिहास घडविला आहे.

ज्या काळात घराच्या चार भिंतीत बंद करून तिला, चूल आणि मुल असे हेच तिचे जीवन आहे, हे सांगितले जात होते, त्या काळात महिलांनी त्या बेड्या तोडून विज्ञानात यशाचा झेंडा रोवला, अशा महिलांमध्ये जानकी अम्मल, आनंदीबाई जोशी, असीमा चटर्जी, अण्णा मणी यांचा समावेश आहे. केरळमधील जानकी अम्मल या महिला वनस्पतीशास्त्रीची वैज्ञानिक होती. त्यांनी उसाच्या हायब्रीड प्रजातीचा शोध लावला. कॅन्सरचा,

पॅरेलिसिसचा शोध व त्यावरील उपाय यांचा शोध डॉ. असिमा चटर्जी यांनी लावला. अण्णा मणि या महिलेने सौरकिरण, वायुउर्जा यांवर कार्य केले. महिलांनी फक्त विज्ञानातच नाही तर, गणित, खगोलशास्त्र यावर-देखील पावरफुल काम केले आहे तसेच एक प्रख्यात वैज्ञानिक महिला म्हणजे डॉ. टेस्सी थॉमस या केरळ-मधील भारतीय वैज्ञानिक होत्या.

18 सप्टेंबर 1965 मध्ये जन्म झालेल्या डॉ. टेस्सी थॉमस एक प्रख्यात वैज्ञानिक आहे. त्यांना आग्नि-पुत्री म्हणुन ओळखले जाते. त्या भारतातील केरळ-मधील अलाप्पुझा या छोट्याशा गावात राहत होत्या. मोठ्या झाल्यावर टेस्सी थॉमसने विज्ञान व गणित विषयात अनमोल प्रगती केली. त्यांनी त्रिशुर इंजिनिअरिंग कॉलेजमधुन डिग्रीचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्णझाल्यावर, 1988 मध्ये त्यांनी रक्षा अनुसंधान आणि विकास संगठन (D.R.D.O) मध्ये पदार्पण केले. डॉ. टेस्सी थॉमस यांनी आपल्या करिअरची सुरुवात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केली. डॉ. अब्दुल कलाम हे त्यांचे आदर्श होते. त्यांनी मिसाईल गाईडन्स मध्ये डॉक्टरी मिळविली.

डॉ. टेस्सी यांची हुशारी पाहुन डॉ. अब्दुल कलाम यांनी

आग्नि क्षेपणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. तीन

हजार कि. मी.चा पल्ला असणाऱ्या आग्नि III प्रोजेक्टच्या

त्या असोशिअन डायरेक्टर होत्या, तर अग्नि पाच कि. मी. पल्ला असणाऱ्या आग्नि पाच या प्रोजेक्टच्या त्या डायरेक्टर बनल्या, ज्याची 19 एप्रील 2012 रोजी यशस्वीरीत्या चाचणी घेण्यात आली. 1 जुन 2018 रोजी त्या डी.आर.डी.ओ.च्या महासंचालक झाल्या.

डॉ. टेस्सी थॉमस ह्या इंडियन नॅशनल अकादमी ऑफ इंजिनिअरिंग झनीन्यु इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स इंडिया आणि टाटा अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस मध्ये एक प्रतिष्ठित सदस्य आहेत. त्यांच्या या शोधक लढाईमध्ये त्यांच्या आईचे त्यांना पूर्ण सहकार्य होते. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल डॉ. थॉमस यांना लाल बहादुरशास्त्री हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच 2018 मध्ये डॉ. थॉमस यांना फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट, जयपुर येथे कंगन लीडरशीप अवॉर्ड देखील मिळाला. 2022 मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानेही डॉ. टेसी थॉमस यांना सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे आयोजित ETP Prime Women Leadership Awards 2023 मध्ये डॉ. थॉमस यांना 'वुमन पायनियर ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला. त्यांना भारताची मिसाइल वुमन म्हणून ओळखले जाते.

अशा अनेक महिलांना विज्ञान क्षेत्रात आपले मोलाचे योगदान दिलेले आहे. तसेच डॉ. आनंदीबाई जोशी यांचे पहिल्या महिला, भारतीय डॉ. म्हणून घेतले जाते. अत्यंत कर्मठ समाजामध्ये जगताना एखाद्या महिलेने तेही विवाहित महिलेने परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणे हे कोणाच्या मनातही आले नसते. परंतु आनंदीबाईंचे पती गोपाळराव जोशी यांच्या आग्रहामुळे सुरुवातीला शिक्षण घेतले. नंतर वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्वानियाला घेतले. शिक्षण झाल्यानंतर त्या पुन्हा भारतात आल्या. काही काळ कोल्हापूरच्या संस्थानामध्ये त्यांनी नोकरीही केली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी एका मुलास जन्म दिला, पण ते मूल जास्त काळ जगू शकले नाही. आनंदीबाईंनाही विविध आजारांनी ग्रासले, त्यातच त्यांचे निधन झाले, परंतु त्यांनी भारतीय वैद्यकीय शाखेमध्ये महिलांना प्रवेश मिळवून दिला.

अशा अनेक महिलांचा वैज्ञानिक ज्ञानात 'खारीचा वाटा' आहे. डॉ. आदिती पंतसारखी महिला संशोधक अंटार्क्टिका मोहिमेवर संशोधक पथकात सामील होते. डॉ. रजनी भिसेंसारखी एक स्त्री शास्त्रज्ञ महिलांना व तरुणांना होणाऱ्या कर्करोगावर संशोधन करते. कमल रणदिवेंसारखी 'डायनामिक' स्त्री कर्करोगावर संशोधनपर काम करणाऱ्या एका संस्थेच्या संचालकपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळते. डॉ. मेधा खोलेंसारखी महिला वैज्ञानिक हवामानशास्त्र या विषयात उल्लेखनीय असे संशोधन करते. कळवे गावची डॉ. चंदा जोग नावाची स्त्री अवकाशातल्या दीपीका आणि त्यात निर्माण होणारे तारका-समुह यावर जगभरात प्रशंसनीय ठरणारं काम करते. अशा अनेक भारतीय महिला विज्ञान क्षेत्रात जणू सुर्याच्या तेजाप्रमाणे सर्व जगात चमकत आहेत.

लेखिका- मंगला रविंद्र शिरोळे

Updated : 3 March 2025 6:27 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top