Home > News > मोदींवर निशाणा साधत प्रियांका गांधींनी प्रोफाइलवर ठेवला 'हा' फोटो

मोदींवर निशाणा साधत प्रियांका गांधींनी प्रोफाइलवर ठेवला 'हा' फोटो

मोदींवर निशाणा साधत प्रियांका गांधींनी प्रोफाइलवर ठेवला हा फोटो
X

कोविड - १९ विरोधी लसीकरण मोहिमेसंदर्भात केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. देशात कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. याच दरम्यान भारत सरकारने आपल्या देशातून इतर देशांना लस पाठवल्याचं समोर आल्यानंतर मोदी सरकारवर कठोर शब्दात टीका होत आहे.

या दरम्यान दिल्लीत लसीकरण अभियानाबाबत 'मोदी, जी हमारे बच्चों की वॅक्सिन विदेश क्यों भेज दी...' असे पोस्टर लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लागलेल्या या पोस्टरनंतर दिल्लीत पोलिसांनी आत्तापर्यंत एफआयआर दाखल करून 25 जणांना अटक केली आहे.

या पोस्टरलाच आता काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी हत्यार केलं आहे. आज रविवारी 16 मे रोजी प्रियंका गांधी यांनी दुपारी ट्विटरवरचा प्रोफाइल फोटो काढून त्या जागी मोदींवर टीका करणारे पोस्टर प्रोफाइल फोटो म्हणून ठेवले आहे.

त्यांच्या प्रोफाइलवर आता "मोदी जीं आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली ?" असा सवाल करण्यात आला आहे,

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि प्रियांका गांधी यांचे भाऊ राहुल गांधी यांनी सुद्धा हे पोस्टर शेअर करत ट्विट केलं आहे. राहुल गांधींनी त्यांच्या ट्वीटमधून थेट मोदी सरकारला चॅलेंच केलं असून "मला ही अटक करा" असं या ट्वीट चं कॅप्शन आहे.

कोविड - १९ विरोधी लसीकरण मोहिमेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे पोस्टर्स लावल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आत्तापर्यंत 25 जणांना अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे हे पोस्टर दिल्लीमधील अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. ज्यावर "मोदी जी आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली ?" असा सवाल केला आहे.

पोलिसांना पोस्टर्सबाबत माहिती मिळाली, त्यानंतर त्यानीं वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला. तक्रारींच्या आधारे दिल्ली पोलिसांनी जन प्रतिनिधींच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात लावलं जाणारं कलम लावण्यात आलं आहे. त्या नुसार भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये विविध जिल्ह्यांमध्ये २५ एफआयआर दाखल करून २५ लोकांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर - पूर्व दिल्लीमधून तीन एफआयआर नोंदविण्यात आल्या असून तिथून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पश्चिम दिल्लीत तीन एफआयआर दाखल करण्यात आले असून तिथून पाच जणांना अटक करण्यात आली. तसेच बाह्य दिल्लीमध्ये तीन एफआयआर नोंदविले गेले असून तिथून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. राजधानी दिल्लीमधील उत्तर - पश्चिम भागात चार एफआयआर दाखल झाल्या असून तिथून दोन लोकांना अटक करण्यात आली आहे.

Updated : 17 May 2021 11:08 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top