"आधी काम करा मगच उमेदवारी" सोनिया गांधींचा पदाधिकाऱ्यांना इशारा..
X
पाच राज्याच्या पराभवावर आणि काँग्रेस च्या दयनीय अवस्थेवर सध्या काँग्रेस चं राजस्थानमधील उदयपूर येथे चिंतन शिबीर सुरू आहे. या शिबिरात काँग्रेस चे 430 दिग्गज नेते सहभागी झाले आहेत.
या चिंतन शिबिराच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाला संबोधित करताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला.
त्या म्हणाल्या, केंद्रात असलेले मोदी सरकार देशात भीती आणि ध्रुवीकरणाचं राजकारण करत आहे. अल्पसंख्यक लोकांवर निशाणा साधला जात आहे. अल्पसंख्याक लोक आपल्या समाजाचा आणि लोकशाहीचा समान भाग आहेत.
असं म्हणत देशातील सांप्रदायिक वातावरणावरून सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
सोनिया गांधी यांनी यावेळी संघटनेमध्ये बदल करण्याच्या मागणीवर देखील भाष्य केलं. आपल्याला कामकाजात बदल करायला हवा. पक्ष संघटनेकडे आता व्यक्तिगत महत्वाकांक्षा बाजूला ठेऊन पाहायला हवं. पार्टीने आपल्याला खूप काही दिलं आहे आता आपण पार्टीला देण्याची गरज आहे.
आधी काम करा मग उमेदवारी
काँग्रेसच्या झालेल्या चिंतन शिबिरात सोनिया गांधींनी पदाधिकाऱ्यांना आधी काम करा मगच उमेदवारी मिळेल असा इशाराच दिला आहे. या चिंतन शिबिरात बोलताना त्यांनी म्हंटल आहे की, आता निवडणुकीत मागेल त्याला उमेदवारी दिली जाणार नाहीये. उमेदवारी हवी असेल तर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना आता किमान पाच वर्ष सक्रिय राहण्याची अट घातली जाणार आहे.