Home > News > 'पोर ढसा-ढसा रडतायत..'; आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ

'पोर ढसा-ढसा रडतायत..'; आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ

पोर ढसा-ढसा रडतायत..; आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ
X

आरोग्य विभागातील भरती परीक्षेतील गोंधळ हा पूर्वी झालेल्या गोंधळापेक्षा आता अधिक वाढलाय. आता तर चक्क परीक्षेच्या दिवशीच परीक्षार्थीना वेळ उलटून सुद्धा परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात नाही. पुण्यात शेकडो विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर जमा झाले असून, त्यांची दखल घेण्यासाठी कोणतेही प्रशासकीय अधिकारी उपस्थित नाही. त्यामुळे हतबल झालेले विद्यार्थी ढसा-ढसा रडले.

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील 'गट क' संवर्गातील विविध पदांची भरती परीक्षा आज (रविवार, २४ ऑक्टोबर) पार पडत आहे. राज्यभरातील विविध केंद्रांवर दोन सत्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे. पहिले सत्र सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुसरे सत्र दुपारी ३ ते ५ या वेळेत होणार आहे. चार लाखांहून अधिक परीक्षार्थी विविध पदांसाठी ही परीक्षा देत आहे. मात्र पहिल्याचा पेपरला मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे.

पुण्यात परीक्षा केंद्रावर एक तास अगोदर पोहचून सुद्धा परीक्षार्थीना प्रश्न पत्रिका मिळाली नसल्याचा आरोप विध्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे परीक्षेसाठी आलेल्या तरुणांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. पुण्याच्या आझम कॅम्पसमधील परीक्षा केंद्रावर विध्यार्थी सकाळी 9 वाजताच उपस्थित राहिले. मात्र 10 वाजून गेल्यानंतर सुद्धा विध्यार्थी पेपरची वाट पाहत होते. त्यामुळे विध्यार्थ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळाला.

Updated : 24 Oct 2021 11:50 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top