'आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि मग...' केंद्राच्या दर कपातीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची टीका
X
शनिवारी संध्याकाळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी ट्विट करत इंधनांवरील उत्पादन शुल्क कमी करत असल्यामुळे इंधनांच्या दरात कमालीची कपात होणार असल्याची माहिती दिली. ही बातमी पाहिल्यावर अनेकांनी जल्लोष व्यक्त केला. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर मात्र या वरून टीका केली आहे.
"आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना न अडकवता ६-७ वर्षांपूर्वीच्या अबकारी कराइतकी कपात केल्यास देशातील नागरिकांना दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले आहे.", असं ट्वीट मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलं आहे.
आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना न अडकवता ६-७ वर्षांपूर्वीच्या अबकारी कराइतकी कपात केल्यास देशातील नागरिकांना दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 21, 2022
पण मुख्यमंत्र्यांच्या या ट्विटवर नेटकरी मात्र चांगलेच चिडलेले पाहायला मिळाले. निळू भाऊ या वापरकर्त्याने ट्विट करत मुख्यमंत्र्यांना Worst Cm Ever असं म्हटलं आहे. आपल्या ट्विट मध्ये तो, "थोडी जनाची नाही मनाची,आपण ज्या पदावर आहे त्या पदाची चाढ ठेवा, जनतेचे आपण सुद्धा पाईक लागतो ह्याची काही आठवण ठेवा..भले जनतेने तुम्हाला ना निवडून दिले ना मुख्यमंत्री बनवले पण संविधनिक पदाची लाज ठेवा, आल अंगावर ढकलल केंद्रावर. वाईट वाटत, worst ever CM..", असं म्हणाला आहे.
थोडी जनाची नाही मनाची,आपण ज्या पदावर आहे त्या पदाची चाढ ठेवा, जनतेचे आपण सुद्धा पाईक लागतो ह्याची काही आठवण ठेवा..भले जनतेने तुम्हाला ना निवडून दिले ना मुख्यमंत्री बनवले पण संविधनिक पदाची लाज ठेवा, आल अंगावर ढकलल केंद्रावर. वाईट वाटत, worst ever CM..https://t.co/XPlR2Y7ih6
— Nilubhau (@Nilaakash83) May 21, 2022
तर हिंदूस्थान या ट्विटर वापरकर्त्याने तर आपण नाममात्र तरी कमी करा असं म्हणत टीका केली आहे. "तुम्ही नाममात्र तरी करून दाखवा! मुंबईत पेट्रोलच्या विक्रीवर राज्य सरकार प्रती लिटर ₹३२.५० वसूल करत आहे. तुम्ही पण "नाममात्र" ₹९.५० सोडा की!! नागरिकांना ₹१९/- प्रती लिटर चा दिलासा आवडेल.", असं म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे.
तुम्ही नाममात्र तरी करून दाखवा! मुंबईत पेट्रोलच्या विक्रीवर राज्य सरकार प्रती लिटर ₹३२.५० वसूल करत आहे. तुम्ही पण "नाममात्र" ₹९.५० सोडा की!! नागरिकांना ₹१९/- प्रती लिटर चा दिलासा आवडेल.https://t.co/mGlWFczYtS
— || हिंदुस्थान || (@vyangyanik) May 21, 2022
तर माऊली या वापरकर्त्याने मुख्यमंत्र्यांना अर्थशास्त्राची तोकडी समज असल्याचं म्हटलं आहे. "माननीय उद्धवजींना अर्थशास्त्राची तोकडी समज आहे, हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे..
पण एक मुख्यमंत्री कार्यालयातून असं वक्तव्य येण दुर्दैवी...
काँग्रेसशासित राज्यांनी सुद्धा पेट्रोल दाम कमी केले, पण महाराष्ट्राची जनता तुमचे कर्म भोगत राहिली..." असं म्हणत टीका केली आहे.
माननीय उद्धवजींना अर्थशास्त्राची तोकडी समज आहे, हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे..
— Mauli (@Mauli___) May 21, 2022
पण एक मुख्यमंत्री कार्यालयातून असं वक्तव्य येण दुर्दैवी...
काँग्रेसशासित राज्यांनी सुद्धा पेट्रोल दाम कमी केले, पण महाराष्ट्राची जनता तुमचे कर्म भोगत राहिली...https://t.co/JenFyqss34
तर अनुप या वापरकर्त्याने टीका करताना शिवसेनेची उलटी गिनती सुरू असं म्हटलं आहे. "खरंच खूप निर्लज्ज सरकार आहे महाराष्ट्राची.
भाग्य फुटले माझ्या महाराष्ट्राचे की महा विकास आघाडी चा नावा खाली अशे लोक राज्य करत आहे.
एवढी काळजी होती तर तुम्ही का नाही कमी केले दर.
जनता खरोखर जोरदार उत्तर देणार आहे आपल्याला.
शिव सेना ची उलटी गिनती सुरू." असं म्हणत टीका केली आहे.
खरंच खूप निर्लज्ज सरकार आहे महाराष्ट्राची.
— AnuP 🇮🇳📽 (@anupsjaiswal) May 21, 2022
भाग्य फुटले माझ्या महाराष्ट्राचे की महा विकास आघाडी चा नावा खाली अशे लोक राज्य करत आहे.
एवढी काळजी होती तर तुम्ही का नाही कमी केले दर.
जनता खरोखर जोरदार उत्तर देणार आहे आपल्याला.
शिव सेना ची उलटी गिनती सुरू.https://t.co/w1DLMOkO9J