Home > News > नगर परिषदेच्या सफाई महिला कामगाराचे झाडावर चढून आंदोलन

नगर परिषदेच्या सफाई महिला कामगाराचे झाडावर चढून आंदोलन

नगर परिषदेच्या सफाई महिला कामगाराचे झाडावर चढून आंदोलन
X

बीड नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचारी महिलेने पुन्हा एकदा झाडावर चढून आंदोलन केले आहे. अनिता बचुटे असं या महिला कर्मचाऱ्याचे नाव असून त्यामागील 20 वर्षांपासून बीड नगर परिषदेमध्ये कर्तव्य बजावत आहेत. आपल्या थकीत वेतनाचा जाब कंत्राटदाराला विचारला म्हणून कंत्राटदारांने या महिलेला कामावरून कमी केले. या घटनेनंतर महिलेने विनंती करून देखील तिला कामावर घेण्यात आलं नाही. यादरम्यान कंत्राटदारांने महिलेशी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याने त्याच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, या मागणीसाठी महिला कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे. शासन दरबारी वारंवार विनंती करून देखील कोणतीच कारवाई होत नसल्यानं यापूर्वी देखील या महिलेने झाडावर चढून आंदोलन केले होते. त्यामुळे आज पुन्हा संतप्त महिलेने जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर असणाऱ्या झाडावर चढून आंदोलन केलं आहे. जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्रा महिलेने घेतला आहे. बीड पोलिसांसह नगर परिषदेचे अग्निशमन दल देखील या ठिकाणी महिलेला खाली उतरवण्यासाठी विनवणी करत आहे.


Updated : 27 Dec 2021 8:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top