आई काकू आजीच्या मायेचे हात ते सलोनवाल्यांचे प्रोफेशनल हात, चित्रा वाघ यांना सगळंच आठवलं
X
भाजप नेत्या चित्रा वाघ या नेहमीच आपल्याला विविध कारणांमुळे त्यांच्या आक्रमक स्वरूपात आपल्याल दिसत असतात. विविध राजकारण्यांवर टीका करताना दिसुन येतात. पण नुकतीच त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली ज्यात त्यांची भावनीक बाजू आपल्याला पाहायला मिळाली. केशभुषा करण्यासाठी सलुनमध्ये गेल्यानंतर त्यांना अचानक आई, काकू आणि आजीची आठवण आली आणि तो किस्साच त्यांनी आपल्यासोबत सामायिक केला आहे.
आज रविवार….आठवड्यातील आवडतां दिवस…
इतर कामांसोबतचं शनिवारी रात्री तेलाने मस्त चंपी करून घेतलेले केस धुवायचा ही दिवस…
कितीही त्रास झाला तरी महिलांचा केसांमध्ये जीव गुंतलेलाचं…तसाचं माझा ही..
नीट निगा राखतां नाही आली कि चिडचिड ही होते मग क्षणभरासाठी वाटतं कापून टाकावेत पण हा विचार फक्त क्षणभरासाठीचं असतो मनात…
मग आठवतं केसांच्या वाढीसाठी माझी आई काकू आजींनी घेतलेले श्रम…
लहानपणी ही माझे केस तसे दाट आणि लांबसडक होते..
compulsory दोन वेण्या त्या ही गच्च बांधलेल्या असायच्या..
आमच्या घरी दर रविवारी काकू आणि आजी आम्हा बहिणींचे केस धुवायला शिकेकाई उकळवायच्या …सकाळी बाथरूम मध्ये पेटीकोट डोळ्यांना घट्ट लावून बसायचं आणि काकू किंवा आजी गरम गरम शिकेकाईचं पाणी डोक्यावर ओतायच्या दोन तीन वेळा चोळलं कि स्वच्छ पाण्याने केस धुवायच्या ….इतके करकरीत आणि स्वच्छ केस धुवून निघायचे …मला यातं आवडायचं ते शिकेकाई ज्यात आवळा वगैरे घातला जायचा त्याचा सुगंध २/३ दिवस तरी असायचाचं..
तेव्हा ना शँपू होते ना कंडीशनर म्हणजे असतीलही पण आमच्या घरात नव्हते ….पुढे अगदी कॉलेजला जाईपर्यंत
शँपू लावल्यानंतर पुन्हा कंडीशनर लावावं लागतं हे आम्हाला माहिती ही नव्हतं
तर असं हे माझं आजचं केस पुराण…आई आजी काकू नंतर सलोनवाल्यांच्या हातातं गेलं ….
शिकेकाई आवळ्यांची जागा आता शँपू आणि कंडीशनर ने घेतलीचं..
शिवाय केसांची काळजी घ्यायला सलोनवाल्यांचे प्रोफेशनल हात ही आले…
पण
आजही आई काकू आजीच्या मायेचे हात….शिकेकाईचा आवळा घातलेला सुगंध..सगळचं मिस करतीये…
#सुकेशिनी
चित्रा वाघ