Video:घराच्या मागणीसाठी चिमुकलीचा थेट बच्चू कडू यांना फोन
X
नेहमीच आपल्या कामांमुळे चर्चेत राहणारे मंत्री बच्चू कडू यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात ते एका चिमुकली सोबत फोनवर बोलत आहे. विशेष म्हणजे खुद्द बच्चू कडू यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
झालं असं की, बच्चू कडू हे प्रवासात असताना त्यांना एक फोन आला, आणि तो फोन सोलापूर येथील एक चिमुकली जी दिव्यांग आहे, तिने घराच्या मागणीसाठी केला होता. आपल्या घराच्या मागणीसाठी या चिमुकलीने थेट मंत्री बच्चू कडू यांना फोन लावल, आपली व्यथा मांडली.
तेव्हा चिमुकलीसोबत बच्चू कडू यांनी सुद्धा आपुलकीने संवाद साधत, तुला मदत पोहचेल अशी तिला ग्वाही दिली. फोनवरील या संभाषणाचा व्हिडिओ बच्चू कडू यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेअर करत म्हणाले की. "सहज संवाद होत राहो, सामान्यांचा आम्ही सेवक व्हावे जनसामान्यांचा. गरजूमध्ये प्रचंड विश्वास निर्माण होऊ दे, सेवा घडू दे सेवा घडू दे विठ्ठला. हेच मागणे हीच प्रार्थना. मोबाईलमुळे जग खूप जवळ आले आहे. प्रत्यक्षात आपण एकमेकांपासून कितीही अंतरावर असलो तर मोबाईलमुळे हे अंतर कमी होऊ गेले आहे. आज नैना नागनाथ झोकाळ या चिमुकलीचा फोन आला. ती दिव्यांग आहे. मोबाईलमुळे ती तिच्या समस्या माझ्यापर्यंत पोहचवू शकली. लवकरच तिला आमच्यातर्फे सर्वोतोपरी मदत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे,"असे बच्चू कडू म्हणाले