Home > News > स्वप्न पूर्ण करण्याची संधी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या परीक्षेसाठी नोटीस जारी..

स्वप्न पूर्ण करण्याची संधी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या परीक्षेसाठी नोटीस जारी..

स्वप्न पूर्ण करण्याची संधी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या परीक्षेसाठी नोटीस जारी..
X

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा 2023 साठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) बुधवार, 26 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, पोलीस दल, CAPF, BSF, CRPF, ITBP आणि SSB अंतर्गत विभागांमध्ये सहाय्यक कमांडंटच्या 322 रिक्त पदांची भरती केली जाईल. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ मे निश्चित करण्यात आली आहे.

रिक्त जागा तपशील

BSF: 86 पदे

RPF: 55 पदे

CISF: 91 पदे

ITBP: 60 पदे

SSB: 30 पदे

शैक्षणिक पात्रता काय असणे गरजेचे?

पदवी

वयोमर्यादा?

1 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 25 वर्षे असावे. उमेदवारांचा जन्म 2 ऑगस्ट 1998 पूर्वी झालेला नसावा आणि 1 ऑगस्ट 2003 नंतर झालेला नसावा.

परीक्षेचे स्वरूप कसे असेल..

भरतीसाठी प्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल. परीक्षा 06 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित केली जाईल. लेखी परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका असतील. पहिला पेपर सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुसरा पेपर दुपारी 2 ते 5 या वेळेत होईल.

याप्रमाणे अर्ज करा

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जा.

UPSC CAPF AC 2023 अधिसूचना लिंकवर क्लिक करा.

अधिसूचनेत ऑनलाइन अर्ज करा या लिंकवर क्लिक करा आणि नवीन पृष्ठावरील New Registration वर क्लिक करून नोंदणी करा.

आता लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

Updated : 27 April 2023 8:22 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top