Home > News > बाहेर जेवून आला म्हणून जावयाला सासरवाडीत बेदम झोडपले..

बाहेर जेवून आला म्हणून जावयाला सासरवाडीत बेदम झोडपले..

बाहेर जेवून आला म्हणून जावयाला सासरवाडीत बेदम झोडपले..
X

आता आपला जावई येणार हे कळल्यानंतर मुलीचे आई-वडील घरात लगेच गोडधोड किंवा चिकन-मटनाचा बेत करण्याच्या पाठीमागे लागतात. सासरवाडीत जावई येणार म्हटल्यावर घरात मोठी धांदल असते. अगदी मग तो घरात आल्यापासून बाहेर पडे पर्यंत जे काही त्याला हवं ते अगदी त्याच्या हातात दिलं जातं. सासरवाडीत जावयाचा एक वेगळाच दरारा असतो. आता जावयाला इतका मान का दिला जातो कोणास ठाऊक, पण आता जे घडलंय ते फारच खतरनाक आहे.

तर ही घटना आहे औरंगाबाद जिल्यातील मुकुंदवाडी येथील. तर घडलं अस की, जावई बाहेर जेवण करून आल्याचा राग आल्यामुळे सासरवाडीच्या मंडळींनी जावयाला लोखंडी रॉडणे मारहाण केली. ही घटना घडली 12 जूनला रात्री नऊ वाजता. मग काय आता या विरोधात पोलिसात तक्रार झाली आहे.

आता सासरवाडीत जावयाचा फक्त मानसन्मानच होतो अशी जर तुमची समजूत असेल तर तुम्ही ही बातमी वाचली असेल.


हे ही वाचा...


दिल्ली पोलिसांनी कपडे फाडले पाणी सुद्धा दिलं नाही' असे आरोप करणाऱ्या या महिला खासदार नक्की कोण आहेत?


दिल्लीत बुधवारी झालेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या वादात एका महिला खासदाराने दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी काँग्रेस खासदार जोथिमनी यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे ज्यामध्ये महिला खासदाराने दिल्ली पोलिसांनी आपल्यावर क्रूरपणे मारहाण केली आणि तिचे कपडेही फाडल्याचा आरोप केला आहे. पिण्याचे पाणीही दिले नाही. त्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक देण्यात आली. असेही आरोप त्यांनी केले आहेत.

कोण आहे ही महिला खासदार?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसणारी महिला तामिळनाडूमधील करूर येथील काँग्रेस च्या खासदार आहेत. जोथिमनी असं त्यांचं नाव आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ ती सहभागी झाल्या होत्या

व्हिडिओमध्ये जोथिमणी तिचे फाटलेले कपडे दाखवताना दिसत आहे. त्याच्या पायात एकच चप्पल आहे. दिल्ली पोलिसांनी आम्हाला क्रूरपणे बस मधून आणले असा त्यांचा आरोप आहे. त्या व्हिडिओ मध्ये म्हणत आहेत की, माझा कुर्ता फाडला, चप्पल काढली आणि आम्हाला गुन्हेगारांप्रमाणे बसमध्ये चढवण्यात आले. पोलिसांनी देखील आम्हाला पाणी देण्यास नकार दिला आणि आम्ही पाणी विक्रेत्याकडे पाणी मागितले असता आम्ही त्याला ते घेऊ दिले नाही. त्यांच्यासोबत आणखी 7 ते 8 महिलांना बसमध्ये बसवण्यात आले.

काय म्हणाले काँग्रेस नेते शशी थरूर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर महिला खासदाराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्या आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल सांगत आहेत. तसेच शशी थरूर यांनी म्हंटल आहे की, ही वृत्ती कोणत्याही लोकशाहीसाठी अत्यंत लज्जास्पद आहे. महिला आंदोलकासोबत असे वागणे अशोभनीय आहे आणि सभ्यतेच्या नियमांचे उल्लंघन आहे. लोकसभा खासदाराला असे करणे अत्यंत चुकीचे आहे. दिल्ली पोलिसांच्या या वागण्याचा मी निषेध करतो. तसेच, त्यावर कारवाई करण्याचे आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला करत आहे.

दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचे दावे फेटाळून लावले आहेत.

विरोध का सुरू झाला?

नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राहुल गांधी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) चौकशीसाठी हजर झाले. सत्ताधारी भाजपच्या सूडाच्या राजकारणा विरोधात म्हणून पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले.

अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्ष कार्यालय आणि तपास संस्थेच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. काँग्रेसने त्यांच्या ट्विटर हँडलवरून आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये निषेध करणाऱ्या महिलांना बसमध्ये ओढले जात आहे.

केसी वेणुगोपाल, भूपेश बघेल आणि रणदीप सुरजेवाला यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी सांगितले की, पोलिसांनी पक्षाच्या मुख्यालयात घुसून कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना ताब्यात घेतले. मात्र, दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचे हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.



Updated : 17 Jun 2022 10:10 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top