मुलाला नाल्यात वाहून जाताना पाहून मांजरांनी आवाज केला आणि मग...
X
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाल्यात एक मूल वाहत असल्याचे पाहून काही मांजरींनी आवाज काढण्यास सुरुवात केली. यानंतर स्थानिक लोकांनी त्याला पाहिले आणि त्यांनी मुंबई पोलिसांना माहिती दिली. मुंबई पोलिसांचे पथक क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलाची सुटका केली. ही घटना मुंबईतील पंतनगर भागातील आहे.
सोमवारी सायंकाळी कोणीतरी मुलाला नाल्यात फेकून दिले होते. मुंबई पोलिसांनी या घटनेबाबत ट्विट करून सांगितले की, "रस्त्यावर फिरणाऱ्या काही मांजरींनी मुलाला कपड्यात गुंडाळलेले पाहिले, त्यानंतर तिने आवाज करायला सुरुवात केली, मांजरीचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक बाहेर आले. लोकांनी पंतनगर पोलिस स्टेशनला फोन केला. तात्काळ माहिती दिली. आणि शहरातील क्राईम हॉटस्पॉटवर गस्त घालणारे मुंबई पोलिसांचे निर्भया पथक घटनास्थळी पोहोचले."
एक नवजात अर्भक कपड्यात गुंडाळून नाल्यात फेकले गेले असल्याची माहिती पंतनगर निर्भया पथकाला एका हितचिंतकाकडून मिळाली होती.
— Mumbai Police (@MumbaiPolice) November 15, 2021
शेजारच्या मांजरींनी ओरडुन गोंधळ केल्याने ती व्यक्ती सावध झाल्याचे समजले.
बाळाला त्वरित राजावाडी रुग्णालयात नेले असून बाळ आता सुरक्षित आहे.#MumbaiCaseFiles pic.twitter.com/TxylValy5S
मुलाच्या पालकांचा शोध सुरू आहे
"पंतनगर पोलिस स्टेशनच्या निर्भया पथकाने मुलाला राजावाडी (रुग्णालय) येथे नेले आणि आता ते मूल सुरक्षित आणि बर झाले आहे," असे पोलिसांनी मुलासोबतच्या अधिकाऱ्यांच्या छायाचित्रासह पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मुलाच्या पालकांची किंवा कोणी फेकली त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात तपास सुरू केला आहे.