कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी काँग्रेस मध्येच राहणार...काय म्हणाल्या पहा
X
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि खरंतर त्यानंतर पंजाब मधील काँग्रेसच्या गोटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. या घटनेनंतर ज्यांच्याशी अमरिंदर सिंह यांचे तीव्र मतभेद होते त्या नवज्योत सिंग सिद्धू यांनीदेखील पक्ष प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
या सगळ्या घडामोडीनंतर पंजाब कॉंग्रेसमध्ये मोठा गोंधळ झाल्याचे सर्वांसमोर आले. हे सगळं जरी होत असेल तरीही काँग्रेसच्या खासदार असलेल्या अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परणीत कौर यांनी मात्र काँग्रेसमधून बाहेर पडण्यास नकार दिला आहे. त्यांनी मी काँग्रेस मधून बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट केला आहे.
परणीत कौर यांनी "मी काँग्रेस पक्षासोबतच राहणार असून मी काँग्रेसची खासदार आहे. सध्या तरी माझा काँग्रेस पक्ष सोडण्याचा कसलाही विचार नाही" असे म्हंटले आहे. त्यामुळे या सगळ्या गोंधळात कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर त्या देखील काँग्रेस सोडतील अशी चर्चा होती. त्या आता चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.