''पगारदार आणि मध्यमवर्गाच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प'' मंत्री यशोमती ठाकूर यांची टीका..
X
आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प पगारदार आणि मध्यमवर्गाच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प असल्याचे म्हणत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी जोरदार टीका केली आहे.
यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत ''पगारदार आणि मध्यमवर्गाच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प. कोविड काळात संकटात सापडलेल्या मध्यमवर्गासाठी आयकरात कुठलाच बदल किंवा सवलत नाही. हे सरकार संवेदनशील नाही. सामान्य माणसांचा आवाज ऐकायचा नाहीच असंच सरकारने ठरवलेले दिसतेय. '' अशी टीका केली आहे.
पगारदार आणि मध्यमवर्गाच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प. कोविड काळात संकटात सापडलेल्या मध्यमवर्गासाठी आयकरात कुठलाच बदल किंवा सवलत नाही. हे सरकार संवेदनशील नाही. सामान्य माणसांचा आवाज ऐकायचा नाहीच असंच सरकारने ठरवलेले दिसतेय. @INCIndia #BudgetSession2022 #BudgetSession
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) February 1, 2022
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचे आर्थिक बजेट मांडले. यामध्ये आयकरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे विरोधक जोरदार आक्रमक झाले आहेत. अनेकांनी हा अर्थसंकल्प मध्यमवर्गाच्या तोंडाला पाने पुसणार असल्याचे म्हणत या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे.