3 वर्षात ३८,८०० शिक्षकांची भरती होणार : निर्मला सीतारामन
X
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 -24 साठी अर्थसंकल्प सादर केला आहे.भारताचा स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना देशात शिक्षणाची काय अवस्था आहे? यावर काय योजना राबवल्या जातील? याची उत्तर आजच्या बजेट मधून समोर आली आहेत. 38 हजार 800 शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे .यामध्ये एकलव्य योजनेअंतर्गत निवासी शाळांसाठी ही भरती होणार आहे. त्याचबरोबर डिजिटल ग्रंथालयाची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केली जाणार आहे.शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी वेगवगळ्या योजना राबवल्या जाणार आहेत
हा अर्थसंकल्प सात आधारांवर मांडला गेला आहे .यंदाच्या अर्थसंकल्पामुळे सामान्य माणसांना काय फायदा होणार आहे ?शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधा यासाठी कोणत्या योजना या बजेट मधून राबवल्या जाणार आहेत ? हे माहीत असणं गरजेचं आहे
अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पाचे सात आधार सांगितले. यावेळी अर्थसंकल्पात सात गोष्टींना प्रधान्य दिले आहे.
१) सर्वसमावेश विकास
२) वंचित घटनांना प्रधान्य
३) पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक
४) क्षमता विस्तार
५) हरित विकास
६) युवक
७) आर्थिक क्षेत्राचा विकास
कॉमन ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड वापरता येणार आहे
सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये पॅन कार्डचा वापर आता कॉमन ओळखपत्र म्हणून केला जाईल, अशी महत्त्वाची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे .