Home > News > ब्रिटनमध्ये 'डेट रेप ड्रग्स'चे हल्ले; महिलांमध्ये दहशत

ब्रिटनमध्ये 'डेट रेप ड्रग्स'चे हल्ले; महिलांमध्ये दहशत

ब्रिटनमध्ये डेट रेप ड्रग्सचे हल्ले; महिलांमध्ये दहशत
X

युनायटेड किंगडमच्या (United Kingdom) अनेक शहरांमधील महिलांना नाईटक्लब आणि पबमध्ये डेट रेप ड्रग्सद्वारे (Date Rape Drugs) लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मद्यालये व नाइट क्लबमध्ये सिरिंजद्वारे इंजेक्शन देण्याच्या काही घटनांनी ब्रिटनची चिंता वाढवली आहे. नॉटिंगहॅम आणि एडिनबर्ग सारख्या ठिकाणच्या महिलांनी सोशल मीडियावर असे अनुभव शेअर करत याचिकांवर स्वाक्षरी केली आहे. डेट रेप ड्रग हल्ले शोधण्यासाठी आणि रोखण्यासाठी संरक्षण किट आणि उपकरणांची मागणी देखील या महिलांनी केली आहे.

पेयामध्ये मादक पदार्थ मिसळण्याच्या घटना ब्रिटनमध्ये दीर्घ काळापासून चिंतेचा विषय आहे. २०१९ मध्ये बीबीसीच्या तपासानुसार इंग्लंड आणि वेल्समध्ये २०१५ नंतरपासून पेयामध्ये मद्य किंवा मादक पदार्थ मिसळण्याची २६०० पेक्षा जास्त प्रकरणे झाले आहेत.

नॉटिंगहॅममधील १९ वर्षीय महविद्यालयन तरुणी झारा ओवेनचे प्रकरण गेल्या आठवड्यात चर्चेत होते. नॉटिंगहॅमशायर लाइव्हच्या वृत्तानुसार, झाराने सांगितले की, 11 ऑक्टोबरला ती मित्रांसोबत क्लबमध्ये गेली होती. रात्रीच्या वेळी ती एकटीच बाहेर गेली. यादरम्यान, तिला काहीतरी टोचले, जे पूर्णपणे समजण्यासारखे नव्हते. यानंतर काही वेळात तिला नशा होऊ लागली.याचप्रमाणे अनेक महिलांनी असाच आपला अनुभव सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

Updated : 25 Oct 2021 9:24 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top