असं काय झालं की भर मांडवात वधूकडच्यांनी वराला धू-धू धूतला, व्हिडीयो झालाय व्हायरल!
X
अगदी बरोबर वाचलंत! होय लग्नाचा मांडव सजला होता. त्या मांडवात सगळे नातलग जमले होते. वधू वर एमेकांना हार घालणार इतक्यात वराने सासरच्यांकडे 10 लाखांची कॅश आणि क्रेटा कार हुंडा म्हणून मागितली. मुलीचे वडील नरमले त्यांनी ३ लाखाची कॅश आणि अंगठी दिली. पण नवरा 10 लाखाच हुंडा दिल्याशिवाय लग्नच करणार नाही म्हणाला. आणि मग काय नवरा ऐकतच नाही म्हटल्यावर सुरू झाला एकच राडा.... मुलीकडच्यांनी नवरदेवाला असा धू धू धूतला की पुन्हा तो असं काही करायचा विचारही करणार नाही.
या व्हिडीओमध्ये मुलीकडची वऱ्हाडी मंडळी सगळीच नवरदेवाला मारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरं इतका चोप देण्याचं कारण फक्त हुंडा मागणं हेच नाहीये बरं... नवरदेवाने आणि त्याच्या घरच्यांनी मुलीकडच्यांपासून आधीच दोन ते तीन लग्न झाली असल्याची माहिती लपवली होती. या महितीने आधीच लागलेल्या आगीत तेल ओतण्याचं काम केलं आणि मग काय सुरू झाला संपूर्ण राडा... नवऱ्या मुलाला बेदम चोप दिल्यानंतर मुलीकडच्या मंडळींनी पोलिसांना फोन लावला आणि नवरदेवाला अटक करायला लावलीये.
हा सगळा प्रकार उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद इथे घडला आहे. गाझियाबादच्या साहिबाबाद मध्ये ही घटना घडली आहे. या सर्व घटनेवरून आपल्याला एकच दिसून येतं ते म्हणजे हुंडा देणं आणि घेणं दोन्ही फक्त वाईटच!