जपानच्या माजी पंतप्रधानांची हत्या..
X
जपानचे माजी पंतप्रधान Shinzo Abe यांच्यावर भाषण देत असताना गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबाराल ते गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. शिंजो एबे यांच्यावर जपानमधील नारा शहरात गोळीबार करण्यात आला होता. त्यांचा मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना आदरांजली वाहत उद्या एक दिवसाचा राष्ट्रीय शोक पळाला जाणार असल्याचं सांगितलं आहे.
As a mark of our deepest respect for former Prime Minister Abe Shinzo, a one day national mourning shall be observed on 9 July 2022.
— Narendra Modi (@narendramodi) July 8, 2022
शिंजो एबे हे शुक्रवारी पश्चिम जपानमधील नारा शहरात भाषण देत होते. यावेळी त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. त्यामुळे शिंजो एबे जागेवरच कोसळले होते त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
शिंजो आबे कोण होते ?
शिंजो आबे हे जपानचे माजी पंतप्रधान आहेत. त्यांनी 1993 ते 2006 या काळात हाऊस ऑफ रिप्रेंझेटेटिव्ह चे सदस्यत्व भुषवले. तर पुढे लिबरल डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष आणि 2006 ते 007 या काळात जपानचे पंतप्रधानपद भुषवले. त्यानंतर 2012 मध्ये त्यांना पुन्हा बहुमत मिळाले. त्यावेळी शिंजो अबे जपानचे पंतप्रधान बनले. तर त्यानंतर सलग 8 वर्षे पंतप्रधान पद भुषवणारे ते जपानमधील पहिले व्यक्ती होते. मात्र 2020 मध्ये त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. त्यानंतर जपानच्या पंतप्रधानपदी योशिहिदा सुगा यांची निवड करण्यात आली. भारत सरकारने 2021 मध्ये शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.