Home > News > "नग्न होणं अपराध तर..." या अभिनेत्रीने केलं मिलिंद सोमण यांचं समर्थन

"नग्न होणं अपराध तर..." या अभिनेत्रीने केलं मिलिंद सोमण यांचं समर्थन

नग्न होणं अपराध तर... या अभिनेत्रीने केलं मिलिंद सोमण यांचं समर्थन
X

"जर नग्नता हा गुन्हा असेल तर नागा साधूंना अटक का करत नाही?" ही प्रतिक्रीया आहे अभिनेत्री पूजा बेदी यांची. गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी अभिनेता मिलिंद सोमणविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. गोव्यातील वास्को पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणावर अभिनेत्री पूजा बेदी हिने प्रतिक्रिया दिली आहे.

पूजा म्हणते, 'मिलिंदने केलेल्या फोटोशूटमध्ये आक्षेपार्ह काय काय आहे तेच मला कळत नाही. जो फोटो आहे त्यात काहीच आक्षेपार्ह नाही. त्यांना मिलिंदचा फोटो असभ्य वाटतो त्या मंडळीने मिलिंदने जे दाखवलेलं नाही ते पाहण्याचा प्रयत्न करताहेत. त्यामुळे त्यांना तो फोटो अश्लील वाटतो. असं असेल तर मग नागा बाबांचीही तक्रार करायला हवी. तेही तितकेच दोषी आहेत. केवळ अंगाला राख फासली म्हणून काही होत नसतं.

दरम्यान, मिलिंद सोमण यांच्यावर सोशल मिडिया पोस्टसाठी गोव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तेथे तो बीचवर विवस्त्र पाळताना दिसत आहे. त्याच्यावर आयपीसी कलम (२४ (अश्लील कृत्ये आणि गाणी) आणि (67 (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील साहित्य प्रकाशित / संप्रेषणासाठी शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Updated : 10 Nov 2020 7:06 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top