Home > News > आणि नवज्योतसिंग सिद्धूच्या घरावरील काळा झेंडा मुलगी रबियाने उतरवला...

आणि नवज्योतसिंग सिद्धूच्या घरावरील काळा झेंडा मुलगी रबियाने उतरवला...

आणि नवज्योतसिंग सिद्धूच्या घरावरील काळा झेंडा मुलगी रबियाने उतरवला...
X

पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या निवासस्थानी कृषी कायद्यांविरोधात उभारलेला झेंडा अखेर खाली घेण्यात आला आहे. अमृतसर शहरातील घराच्या टेरेसवर नवज्योतसिंग सिद्धू यांची मुलगी राबिया सिद्धूने ते हा काळ झेंडा लावला होता. आता हे बिल परत घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली त्यामुळे सिद्धू यांच्या मुलगीने हा काळा काढून टाकला आहे. विशेष म्हणजे राबिया गेल्या काही काळापासून राजकारणात सुद्धा सक्रिय होत आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी एकाच वेळी अमृतसर आणि पटियाला या दोन्ही निवासस्थानी कृषी कायद्यांविरोधात काळे झेंडे फडकावले होते. पटियालामध्ये त्यांनी स्वतः तर अमृतसरमध्ये त्यांच्या मुलीने झेंडा फडकावून शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवला होता. आता तिन्ही बिले मागे घेण्यात येणार असल्याचं सांगितल्यानंतर राबियाने होली सिटीमधील तिच्या घराच्या छतावरूनही हा झेंडा काढला आहे. व गुरु नानक देवजींच्या प्रकाश पर्व सारख्या चांगल्या दिवसावर शेतकरी विजयी झाल्याचं म्हंटले आहे.

राबिया आता राजकारणात सक्रिय होत आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांच्या अनुपस्थितीत. गेल्या महिन्यात दोनदा राबियाने सिद्धू यांच्या मतदारसंघ वेरका याठिकाणी जाऊन त्यांनी नवीन कामांचा शुभारंभ करून परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. आशा प्रकारे हळूहळू त्या सुद्धा राजकारणात सक्रिय होत आहेत.

Updated : 21 Nov 2021 2:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top