जलयुक्त शिवारच्या चौकशी बाबत पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रीया, म्हणाल्या...
X
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेतील गैरकारभाराबाबत 'कॅग'ने ताशेरे ओढल्यानंतर चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. यावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुळाखतीत भाष्य केलं आहे.
पंकजा मुंडे यांनी "जलयुक्त शिवार योजनेचा उद्धेश अत्यंत चांगला आणि लोकहिताचा आहे. चौकशी लावावी की नाही हा राज्य सरकारचा प्रश्न आहे. बीडमध्ये पाणी आडवा, पाणी जिरवा याचा किती फायदा झाला की हे लोकांना माहिती आहे. ही लोकांची योजना आहे." असं म्हटलं आहे.
दरम्यान, विधानसभेतल्या पराभवानंतर पंकजा मुंडे पक्षावर नाराज होत्या. त्यांनी ती नाराजी अनेकदा जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. खडसे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्रितपणेही काही जाहीर कार्यक्रमांमधून आपल्या मनातली खदखदही बोलून दाखवली होती. पंकजा मुंडे यांची नुकतीच भाजपच्या राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपने केला असल्याचं म्हटलं जातं.