Home > News > 'नवाब मियाँ'ना ड्रग्जची कावीळ झालायं; तब्येत तपासून घ्या: श्वेता महाले

'नवाब मियाँ'ना ड्रग्जची कावीळ झालायं; तब्येत तपासून घ्या: श्वेता महाले

नवाब मियाँना ड्रग्जची कावीळ झालायं; तब्येत तपासून घ्या: श्वेता महाले
X

राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत, फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु असल्याचा गंभीर आरोप केला होता. मलीकांच्या या आरोपानंतर भाजपच्या अनेक नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येत असून, मलिक यांच्यावर टीका केली जात आहे. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी सुद्धा मलिकांवर टीका करत "'नवाब मियाँ'ना ड्रग्जची कावीळ झालायं," असा खोचक टोला लगावला आहे.

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देतांना महाले यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, "महाराष्टाचे सर्वात यशस्वी मुख्यमंत्र्यांपैकी एक असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवाब मलिक यांच्या सारख्याने केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. जावई बापू ड्रग्ज प्रकरणात अटकेत असल्याने नवाब मियाँ ना ड्रग्जची कावीळ झाली आहे. मेंदू व तब्येत तपासून घ्या," असा खोचक टोला महाले यांनी यावेळी लगावला आहे.

नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांकडून मलिकांवर टीका केली जात आहे. तर फडणवीस यांनी सुद्धा पत्रकार परिषेद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले असून, नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबध असल्याचे गंभीर आरोप केले आहे. विशेष म्हणजे दिवाळीनंतर याबाबतचे सर्व पुरावे समोर आणणार असल्याचे सुद्धा फडणवीस म्हणाले.

Updated : 2 Nov 2021 9:08 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top