Home > News > नवनीत राणासाठी चित्रा वाघ रिंगणात उतरल्या खऱ्या पण "हास्यास्पद ताई" नेटकऱ्यांनी त्यांचीच घेतली शाळा...

नवनीत राणासाठी चित्रा वाघ रिंगणात उतरल्या खऱ्या पण "हास्यास्पद ताई" नेटकऱ्यांनी त्यांचीच घेतली शाळा...

चित्रा वाघ यांनी नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं खरं पण ते त्यांच्यावरच उलटल्यासारखं झालं आहे. नेटकऱ्यांनी उलट त्यांच्यासमोर गणेश नाइकांवरून प्रश्नांची सरबत्ती लावली आहे.

नवनीत राणासाठी चित्रा वाघ रिंगणात उतरल्या खऱ्या पण हास्यास्पद ताई नेटकऱ्यांनी त्यांचीच घेतली शाळा...
X

गेल्या काही महिन्यांपासून राज्याचं राजकारण फक्त दोष आरोपांवर सुरू आहे. सत्ताधारी पक्षातील नेते विरोधकांवर तर विरोधक हे सत्ताधाऱ्यांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. राज्य महिला आयोग हे सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर झालेल्या आरोपांमध्ये लक्ष घालण्यास हात थोडे आखडते घेते आणि अगदी व्हिडिओही पक्षातील नेत्यांवर आरोप झाले की कडक कारवाई करते. विरोधी पक्षातील महिला नेत्यांचं देखील काही वेगळं नाहीये. चित्रा वाघ या देखील रघुनाथ कुचिक प्रकरणावरून सरकारला अगदी सळो की पळो करून सोडलं होतं. पण गणेश नाईक प्रकरणामध्ये त्यांनी अज्ञातवासात गेल्याप्रमाणे मौन बाळगलं आहे.

त्याच चित्रा वाघ आपल्याला नवनीत राणा प्रकरणात पुन्हा ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे. "महिलांच्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवणार्यार सत्तेचा परिघातल्या महिला नेत्या कुठे मूग गिळून बसतात ती विरोधात असलेल्या महिलेवर झालेला सरकारी अत्याचार चालतो लाखो मतदारांची महिला लोकप्रतिनिधीला रात्रभर लॉकअपमध्ये ठेवलाय डोळ्यावर कातडे ओढून बिळात शिरणाऱ्यांनो बाहेर पडा" आशा प्रकारचं ट्विट त्यांनी नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ केलं आहे.

हनुमान चालिसा म्हणण्यावरून मुंबईत गेले दोन दिवस जो राडा झाला त्याचा अंत नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या अटकेने झाला. त्यांना भायखळ्याच्या आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलंय. पण नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ भाजपकडून फक्त चित्रा वाघच का उतरल्या. भाजपकडून पंकजा मुंडे किंवा इतर महिला नेत्यांनी राणा दांपत्याची अथवा नवनीत रणांची बाजू का घेतली नाही? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.

अजित राणे या वापरकर्त्याने, "हास्यास्पद ताई..

तुम्ही कुठला कातड पांघरल आहे,गणेश नाईकांवर बोला की,तिकडे तोंड शिवल का तुमचं,इतरांवर खोटे आरोप करायचे,विनाकारण नाव खराब करायचं, सुपारी घेऊन काम करता वाटत,कुचिक यांच्या बाबतीत तेच केलं,त्या मुलीने येऊन तुमचं पितळ उघड केलं,सगळे बलात्कारी सेंगर भाजपात आहेत,बोला.." असं ट्विट करत चित्र वाघ यांना सवाल विचारला आहे.

तर हेमंत धनकवडे या वापरकर्त्याने, " अण्णा (गणेश) नाईक यांच काय झालं? कोणता ड्रेस आवडला? शाळेचा की नर्स चा? अन् कोणता सरकारी अन्याय झाला राणा वर?? राणा इतके दिवस इफ्तार करत होत्या अन् अचानक चालीसा आठवली? २५ वर्ष बापाचं नाव न लावता ती माऊली फिरतीये नाईक च्या मागे ते नाही दिसत?? वाह रे महिलांची कैवारी.. नौटंकी..." असं ट्विट करता त्यांना नौटंकी म्हटलं आहे.

नंदू गुरव या वापरकर्त्याने तर अमृता फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उध्वस्त ठरकी म्हणत टीका केलेल्या ट्विट चं स्क्रीनशॉट टाकत, "ताई तुम्ही या भाषेचे समर्थन करता का.???", असा थेट सवालच विचारला आहे.

मधुकर माने यांनी, " अत्याचार? कोणावर झाला अत्याचार? त्या नवनीत राणावर? ती पोलिसांना कसं बोलत होती पाहिलं का तुम्ही? आणि आपापल्या घरात करायचा ना धिंगाणा..दुसऱ्याच्या कशाला?" असं म्हणत नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

एकंदरीत काय तर चित्रा वाघ यांना नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ ट्विट करणं महागात पडलं आहे. कारण नेटकर्यांनी त्यांना थेट गणेश नाईक प्रकरणावर बोलण्याची आठवण करून दिली आहे. शेवटी एकच म्हणावसं वाटतं 'ये पब्लिक है सब जाती है, ये पब्लिक है'

Updated : 25 April 2022 7:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top