आशा वर्कर्सच्या हाती रबरी लिंग, चित्रा वाघ यांची टिका तर आरोग्य विभागाचं समर्थन
बुलढाण्यामध्ये आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्याकरीता रबरी लिग देण्यात आले होते. यावर भाजपकडून टिका तर आरोग्य विभागाकडून समर्थन करण्यात येत आहे.
X
बुलढाण्यामध्ये कुटुंबनियोजनासाठी समुपदेशन करणाऱ्या आशा सेविकांना आरोग्य विभागाने दिलेल्या किट्समध्ये रबरी लिंग देण्यात आलं आहे. त्यामुळे आशा सेविकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाच्या या कारभारामुळे त्यावर महिला वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकारावर सडकून टीका करत सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का असा संताप व्यक्त केला आहे.
आरोग्य विभागाचं समर्थन
आरोग्य विभागाने मात्र या प्रकाराचं समर्थन केलं आहे. आशा सेविकांना दिलेली किट्स जनजागृतीसाठीच आहे, असं आरोग्य विभागाने म्हटलं आहे. तसेच अशा प्रकारचं किट्स दिल्याने लैंगिक आजार सुद्धा कमी होतील, असा दावाही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी या प्रकाराचं समर्थन केलं असलं तरी महिला वर्गातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया येत असल्याने आरोग्य विभागाला रोषाला सामोरे जावं लागण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
जनजागृतीसाठी मदतच
राज्य सरकारकडून आशा सेविकांना दिलेल्या कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंग देण्यात आल्याचे प्रकरण समोर आलंय. सरकारच्या या निर्णयावर आशा वर्कर नाराज असल्याचं चित्र ही पाहायला मिळत आहे. तर आरोग्य विभागाने दिलेल्या या किट जनजागृतीसाठी दिलं असल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलं आहे. यामुळे लैंगिकते संबंधीत आजार सुद्धा कमी होतील अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र सांगळे यांनी दिली आहे.
चित्रा वाघ यांची टीका
हा सर्व प्रकार अजाणतेपणी झाला आहे की, जाणूनबुजून याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र, भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी याप्रकरणी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. बुलढाणा येथे आशा सेविकांना अशा प्रकारचे कीट आणि त्यात रबराचे लिंग देण्यात आल्याचे वाघ यांनी म्हटले आहे. वाघ यांनी याप्रकरणी पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली आहे. तसेच, आशा सेविकांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य याद्वारे करण्यात आल्याने याप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल का, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे राज्यभरात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. तर, याप्रकरणी सखोल चौकशी करुन कठोर कारवाईचे आदेश अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.
शंतनू अभ्यंकर यांचं समर्थन
कुटुंबनियोजनाची साधने योग्य पद्धतीने वापरली जायला हववीत. त्यासाठी लोकशिक्षण हवे. त्यासाठी अशी शैक्षणिक साधने वापरणे हे शास्त्रीय, आवश्यक आणि योग्यच आहे. सरकार निषेधाला नाहीतर अभिनंदनाला पात्र आहे.