Home > News > नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे दीपाली सय्यद अडचणीत

नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे दीपाली सय्यद अडचणीत

नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे दीपाली सय्यद अडचणीत
X

शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद आणि मनसेमधील संघर्ष ताजा असताना आता त्यांचा भाजपसोबतचा संघर्षही दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर दिपाली सय्यद यांच्याविरोधात नवी मुंबईमध्ये भाजपने पोलीस तक्रार दाखल केली आहे. नवी मुंबईतील रबाले एमआयडीसी पोलिस ठाण्यात भाजपतर्फे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दिपाली सय्यद यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करत प्रतिमा मलिन केल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने केली आहे.

दिपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका केली होती. पण यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह शब्द वापरला होता. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले होते ते पाहा, "किरीट सोम्मयाने यांच्यावर आरोप केले मोदींनी त्यांना पक्षात घेतले. आता मोदी कारवाई बद्दल बोलत नाहीत. माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्यावर मधू कोडांशी संबंधित कंपन्यांशी असलेल्या व्यवहारांवरून सोमय्यांनी आरोप केले होते. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांव्यावर पॉन्झी स्किमव्या माध्यमातून १० लाख लोकांची फसवणूक केल्याच्या आरोप सोमय्यांनी केला. मंत्री नारायण राणे यांच्यावर ३०० कोटींच्या मनी लॉण्डिंगचा आरोप केला होता. २०१७ मध्ये सोमय्यांनी हा आरोप केला. यांना पाठीशी घालणारा असा लुच्या पंतप्रधान अख्या भारताने पाहिला नसेल." य़ा शब्दात त्यांनी टीका केल्याने भाजपने ही तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही दोन दिवसांपूर्वी दिपाली सय्यद यांनी ट्विट करत "मोदींनी मसनात जा, शहांनी मसनात जा, वाढती महागाई , दरवाढी आटोक्यात येत नसेल तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या" अशी टीका केली होती.

Updated : 29 May 2022 11:39 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top