ऐन उन्हात हंडाभर पाण्यासाठी पायपीट, ग्रामीण भागाला पाणी टंचाईचे चटके
फक्त दोन हंडे पाण्यासाठी महिलांना करावी लागतेय पायपीट
Max Woman | 15 April 2022 12:58 PM IST
X
X
राज्यात सध्या उष्णतेची लाट आलीये. या लाटेमध्ये सध्या महाराष्ट्र होरपळून निघतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पाण्याची चणचण भासतेय. संगमनेर तालुक्यात सुध्दा अशीच पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे.
संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बघायला मिळत आहे. उष्णता वाढत आहे तसतशी पाण्याची समस्या बिकट होत चालली आहे. काही भागांमध्ये पंचायत समितीकडून टॅंकर चालू झाले आहेत. काही भागांमध्ये टँकर चालू होणार आहेत. संगमनेर तालुक्यातील दरेवाडी भागांमध्ये पाण्याची भीषण समस्या बघायला मिळत आहे. येथील महिला १ किलोमीटर अंतर फक्त काही हंडे पाण्यासाठी कापत आहेत. विहिरीतून दोरीच्या सहाय्याने पाणी ओढून काढावे लागत आहे. येणाऱ्या काळामध्ये पाण्याची समस्या अधिक बिकट होईल असं इथल्या काही महिलांनी सांगितलं आहे.
Updated : 15 April 2022 1:03 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire