Home > News > भावना गवळी यांचे प्रकरण नक्की काय आहे?

भावना गवळी यांचे प्रकरण नक्की काय आहे?

भावना गवळी यांचे प्रकरण नक्की काय आहे?
X

खासदार भावना गवळी या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्या शिंदे गटात जाणार असल्याचं म्हंटल जात आहे. त्या शिवसेनेतून शिंदे गटात जाण्यामागे त्यांची सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी (ED) कडून सुरु असलेली चौकशी असल्याच सुद्धा म्हणलं जात आहे. काही दिवसांपूर्वी ED ने मनिलॉन्ड्रीग प्रकरणात त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर आता राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत ४० पेक्षा जास्त आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले. या सरकारवर ED सरकार म्हणून देखील टीका केली जात आहे. कारण यातील काही आमदारांवर ED च्या चौकशा सुरु आहेत. ED पासून वाचण्यासाठीच हे आमदार भाजपच्या वळचणीला गेले असल्याचं सुद्धा म्हंटल जात आहे. आता आमदारांच्या या बंडानंतर खासदार देखील बंड करणार असल्याची चर्चा आहे. यात भावना गवळी (Bhavana Gavali ) यांचे नाव सर्वात पुढे आहे. याचे कारण असे कि, ED कडून भावना गवळी यांची सुरु असलेली चौकशी. तर भावना गवळी यांचे हे प्रकरण नक्की काय आहे? ED कडून त्यांची चौकशी का सुरु आहे? पहा...

नक्की भावना गवळी यांचे हे प्रकरण आहे तरी काय?

सप्टेंबर महिन्यात 'ईडी'ने भावना गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. या प्रकरणात ईडीनं सईद खान या व्यक्तीला अटक केली होती. सईद खान हे खासदार गवळी यांच्या ट्रस्टमध्ये संचालक आहेत. या ट्रस्टला बेकायदेशीररित्या कंपनीमध्ये रुपांतरित करण्यासाठी सईद खान यांनी मध्यस्थी केली. त्यासाठीच धर्मदाय आयुक्त कार्यालयातही गैरयव्यवहार झाला. एकूण गैरव्यवहार १८ कोटींचा आहे. यात सात कोटी रुपयांच्या रोख रकमेचाही गैरवापर करण्यात आल्याचं म्हणत ED ने त्यांची चौकशी केली होती. त्यासंबंधी अधिक चौकशीसाठीच गवळी यांना तीनवेळा समन्स बजावण्यात आले होते.

ईडीच्या या कारवाईवर गवळी म्हणाल्या होत्या की, भाजपनं जुलमी सत्र सुरू केलं आहे. माझी आणि माझ्या संस्थांची काय चौकशी करायची ती करा. पण शिवसेना हा अन्यायाविरुद्ध लढणारा पक्ष आहे. आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही, माझी चौकशी करताय तर वाशिम जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांची पण चौकशी करा अशी त्यांनी मागणी केली होती.

Updated : 19 July 2022 2:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top