Home > News > मला बाबा नेहमी म्हणायचे .... यशोमती ठाकूर झाल्या भावुक

मला बाबा नेहमी म्हणायचे .... यशोमती ठाकूर झाल्या भावुक

भैय्यासाहेब म्हणतात धुन धुतल्यावर कपडे वाळत घालण्यासाठी आपण त्याला पिळतो ना तस दु:ख पिळून टाकायच असत. आणि या दु:खाला कडक वाळत घालायच म्हणजे आयुष्यात फार त्रास होत नाही."

मला बाबा नेहमी म्हणायचे .... यशोमती ठाकूर झाल्या भावुक
X

आमदार यशोमती ठाकूर यांनी त्यांचे वडील चंद्रकांत ठाकूर यांना जयंतीदिनी अभिवादन केले. भैय्यासाहेबांच्या आठवणीना उजाळा देताना म्हणाल्या "मला बाबा नेहमी म्हणायचे मुलगी रडते तुझा जन्म काय रडण्यासाठी झालाय का ? आयुष्यातल दु:ख... ! तुला धुन धुता येत ना ? मी म्हणाले हो येत ना मला धुन धुता" पुढे यावर त्यांनी आमदार यशोमती ठाकूर यांना दिलेला सल्ला खूप महत्वाचा आहे. भैय्यासाहेब म्हणतात धुतल्यावर कपडे वाळत घालण्यासाठी आपण त्याला पिळतो ना तस दु:ख पिळून टाकायच असत. आणि या दु:खाला कडक वाळत घालायच म्हणजे आयुष्यात फार त्रास होत नाही."भैय्यासाहेब म्हणतात धुतल्यावर कपडे वाळत घालण्यासाठी आपण त्याला पिळतो ना तस दु:ख पिळून टाकायच असत. आणि या दु:खाला कडक वाळत घालायच म्हणजे आयुष्यात फार त्रास होत नाही."व आणि या आठवणी डोळ्या समोर ठेऊन त्या बोलत होत्या यशोमती ठाकूर भावुक झाल्या याक्षणी त्यांची मुलगी त्यांना समोर आधार देते तेंव्हा टेंशन नको घेऊ असे उद्गार त्यांच्या तोंडून येतात.

तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांचे वडील माजी आमदार होते. ते काँग्रेसचे निष्ठावान नेते अशी त्यांची ओळख होती त्यांच्या सहनुभूतीदार वर्गात त्यांना भैय्यासाहेब याच नावाने ओळखले जायचे, पण त्यांच पूर्ण नाव चंद्रकांत रामचंद्रजी ठाकूर असे आहे. भैय्यासाहेब यांना अनंतात विलीन होऊन 6 वर्ष पूर्ण झाली आहेत. भैय्यासाहेब ठाकूर यांचे मुळगाव हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेले मोझरी आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रेरित झालेला हा कॉंग्रेसी नेता अशी त्यांची ओळख होती.

वडिलांच राजकारण धाडसाने चालवणाऱ्या आमदार यशोमती ठाकूर यांनी वडिलांसोबतचे अनेक प्रसंग सांगत भैय्यासाहेब यांना अभिवादन केले. त्या पुढे म्हणतात "कठिण प्रसंग आला की त्यांचे मला शब्द आठवतात आज सहा वर्ष झाली पण आस वाटत की बाबा कालच गेलेत. बाबांनी मला परी सारखं मोठ नाही केल, वाघ कस वाघाच्या पिल्लाला मोठ करतो ना तस त्यांनी मला लहानाच मोठ केल आहे आस यशोमती ठाकूर म्हणतात. पुढे त्या म्हणतात राजकारणातही मी येईल आस मला कधी वाटल नव्हत किंवा माझे पोर ही येतील आस मला काही वाटत नाही पण सामाजिक बांधिलकी आपण ठेवली पाहिजे आणि ती ठेवण्याची गरज आहे.

Updated : 29 Jan 2024 4:27 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top