Home > News > ''अर्रर्रर्रर्रर्रर्र.., काही इज्जत आहे की नाही..'' शिवसेना नेत्याचा एकनाथ शिंदेंना टोला

''अर्रर्रर्रर्रर्रर्र.., काही इज्जत आहे की नाही..'' शिवसेना नेत्याचा एकनाथ शिंदेंना टोला

अर्रर्रर्रर्रर्रर्र.., काही इज्जत आहे की नाही.. शिवसेना नेत्याचा एकनाथ शिंदेंना टोला
X

खरतर महाराष्ट्रात जेव्हा सत्ता बदल झाला त्यावेळी पासून खरे मुख्यमंत्री कोण? म्हणून एकनाथ शिंदे यांना वारंवार ट्रोल करण्यात येत आहे. याचे कारण असे की, अगदी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे हे काही करण्याआगोदर वारंवार देवेंद्र फडणवीसांचा सल्ला घेत असल्याचं माध्यमांच्या कॅमेऱ्यात टिपले गेले. त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा सभागृहात गेले त्यावेळी सर्वाना अभिवाद करण्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारले इतकंच नाही तर हा मुद्दा खरा चर्चेत आला तो म्हणजे एका पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे बोलतं होते आणि ते बोलत असताना अचानकच फडणवीसांनी त्यांचा माईक काढून घेतला व बोलायला लागले. या सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यात कैद झाल्या आणि त्यानंतर शिंदे हे फडणवीसांचे बाहुले बनून काम करत आहेत असं विरोधकांनी म्हणण्यास सुरवात केली. त्यानंतर सुरु झालेली ही टीकेची झोड अजून काही कमी झालेली नाही. आत नुकताच राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. या शपथविधी दरम्यान घडलेल्या एक घटनेनंतर शिवसेनेच्या पदाधीकारी अयोध्या पौळ पाटील यांनी ''अर्रर्रर्रर्रर्रर्र काय हे? काही इज्जत आहे की नाही #महाराष्ट्र राज्याच्या लादलेल्या मुख्यमंत्र्यांची?'' असं म्हणत टीका केली आहे.

तर झालं असं होतं की, राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधी दरम्यान सर्वांची आसन व्यवस्था केलेली होती. यावेळी पहिला मुख्यमंत्री त्यानंतर एक खुर्ची राखीव होती व त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची खुर्ची होती. यावेळी मुख्यमंत्री स्वतः उठून जाऊन मुख्यमंत्र्यांसोबत बोलतात. याच घटनेवरून त्यांना आता ट्रोल केलं जात आहे. अयोध्या पौळ यांनी हा व्हिडिओ शेअर करत 'काही इज्जत आहे की नाही' अशी टीका केली आहे.

Updated : 11 Aug 2022 12:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top