सोन्याचा भाव विक्रमी वाटचलीकडे: लग्न समारंभाच्या हंगामात सर्वसामान्यांना मोठा फटका
X
सोन्याच्या भावात अतिशय वेगाने चढउतार होत असल्याने आठवड्याभरात तीन हजारांनी वाढ झाली आहे. आज सोन्याच्या भाव प्रति 10 ग्राम साठी 58 हजार 400 रुपये भाव आहे.तर चांदी 69 हजार प्रति किलोचा दर आहे.
जळगाव सराफा बाजारात काल प्रति तोळा ( 10 ग्राम ) 58 हजार 800 रुपये भाव होता. तर आज सकाळी सराफा बाजार 58 हजार 400 पर्यंत आला आहे. गेल्या आठवढ्यात सोन्याचा भाव 55 हजारांच्या आसपास होता मात्र एका आठवढ्यात सोने भावात 3 हजार ते 3 हजार 5000 रुपयांनी वाढ झाली आहे.
सोने दर वाढीचे कारण
सोने दर वाढीचे कारण दोन अमेरीका बँक बुडणे, युरोप मधील 5 बँका बंद पडणे.
तसेच स्वीच क्रेडिट स्वीच होण्याबाबतच्या अफवांमुळे सोने दरात उसळी आल्याचं जाणकार सांगत आहे.तसच शेअर मार्केटही खाली आल्याने सोन्याच्या दरात तेजी आल्याचं जाणकार सांगत आहे.
चालू आठवढ्यातच सोन्याचे भाव वाढले आहेत.दरम्यान सोन्याचे आणखीन भाव वाढतील म्हणजेच 60 हजार पर्यंत जातील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.यामुळे भारतातील ऐन लग्न समारंभाच्या हंगामात सर्वसामान्यांना मोठा फटका आहे.